Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात "अशी ही बनवा बनवी", आठवडाभर सदस्यांची होणार तारेवरची कसरत

Bigg Boss Marathi New Season Day 37 : बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. सदस्यांसाठी हा आठवडा कसा रंगणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन आता ३६ दिवस उलटले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमधील राडे पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठी शोचा आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांची चांगलीच झोप उडाली. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सगस्यांची चांगलीच शाळा घेतल्याचं पाहायला मिळावं होतं.

बिग बॉसच्या घरामध्ये दररोज नव्या गोष्टी घडत असतात. गोल्या आठवड्याभरात सदस्यांचे अनेक ड्रामे पाहायला मिळाले. कालच्या भाऊच्या धक्क्याच्या भागामध्ये रितेश भाऊंनी सदस्यांची बोलतीच बंद केली होती. घरातून बाहेर जाण्यााठी वर्षा उसगावर आणि अंकिता वालावलकर या दोघी बॉटम २ मध्ये होत्या. परंतु गेल्या आठवड्यात वोटींग लाईन्स बंद असल्यामुळे कोणीही सदस्य घराबाहेर पडलं नाही.

रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्याच्या भागामध्ये सर्व सदस्यांना हा आठवडा सर्व सदस्यांसाठी अत्यंत कठिण असेल असे सांगीतले. सर्व सदस्यांसाठी हा आठवडा आव्हानात्मक आणि तारेवच्या कसरतीचा असणार आहे. आता घरातील सदस्यांसाठी हा आठवडा कसा रंगणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. प्रोमोमध्ये बिग बॉस प्रेमींच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.

प्रोमोमध्ये डीपी दादा वैभव झालेले दिसत आहेत, जान्हवी निक्की आणि सूरज अरबाजच्या भूमिकेत गेलेला पाहायला मिळत आहे. तिघेही आपली भूमिका उत्तम वठवत आहेत. तिघांचा अभिनय पाहताना प्रेक्षकांना मात्र हसू अनावर होणार आहे.'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात सदस्यांसमोर कोणतं नवं आव्हान उभं ठाकणार? सदस्य यातून कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. सहाव्या आठवड्यात नक्की काय घडणार हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

CJP Protest: 'तुम्ही जनरेशन झेड नाहीत...', आशुतोष रांका आणि सौरव दासला हायकोर्टने फटकारले; सीजेपी नेत्यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT