Amitabh Bachchan New Twit Saam TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Tweet: ‘खेल खतम, पैसा हजम...’ म्हणत बिग बींची एलॉन मस्कवर टीका? ‘ब्लू टीकसाठी तर पैसे भरले आणि आता...’

Amitabh Bachchan Tweet Over Blue Tick: नुकतंच अमिताभ यांनी पुन्हा एक नवं ट्वीट केलंय. त्यात त्यांच्या ब्लू टीकचा देखील समावेश झाला असून त्यात त्यांनी मिश्किल टोमणा मारत बिग बींनी एलॉन मस्क यांना टोमणा मारला.

Chetan Bodke

Amitabh Bachchan New Tweet: ‘२१ एप्रिलला अनेक दिग्गज मंडळींचे ब्लू टिक हटवले होते. अनेक राजकीय मंडळींसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींचे देखील त्यात समावेश होता. बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन ट्वीटरवर बरेच सक्रिय झाले आहेत. बिग बींनी ट्वीटरवर अनेक ट्वीट करत आपली ब्लू टीक परत द्यावी अशी मागणी केली. अखेर बिग बींना त्यांची ब्लू टीक पुन्हा मिळाल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत.

याआधी ट्विटवरने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं ब्लू टिक काढलं होतं. पेड सर्व्हिस सुरु झाल्याने बिग बींसोबतच सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि इतर अनेक सेलिब्रिटींचं ब्लू टिक काढण्यात आलं होतं. नुकतंच अमिताभ यांनी पुन्हा एक नवं ट्वीट केलंय. त्यात त्यांच्या ब्लू टीकचा देखील समावेश झाला असून त्यात त्यांनी मिश्किल टोमणा मारत बिग बींनी एलॉन मस्क यांना टोमणा मारला.

आज सकाळीच बिग बींनी ट्वीट केले आहे, त्यात बिग बी म्हणतात, “ए, ट्विटर! मी ब्लू टिकसाठी पैसे भरले आणि आता तुम्ही म्हणताय की ज्यांचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यांना ब्लू टिक फ्रीमध्ये मिळणार. माझे तर ४८. ४ मिलियन फॉलोअर्स आहेत, आता? खेल खतम, पैसा हजम?” असा मिश्किल टोमणा मारत बिग बींनी एलॉन मस्क यांना टोमणा मारला.

ट्विटरने यापूर्वी पेड सबस्क्रिप्शन सेवा लागू करण्याची घोषणा केली होती, जी मायक्रोब्लॉगिंग साइटवर ब्लू व्हेरिफिकेशन बॅजसाठी 8 डॉलर्स आकारते. ज्यांनी वेळेवर पेमेंट केले नाही किंवा सेवा खरेदी केली नाही, त्यांच्या हँडलवरील निळ्या रंगाचे टिक चिन्ह काढून टाकण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT