Adipurush Controversy Director Om Raut Ferrari F8 Tributo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush Controversy: आदिपुरुषच्या दिग्दर्शकाला मिळाले अनोखे गिफ्ट, किंमत वाचून व्हाल अवाक

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आदिपुरुषच्या दिग्दर्शक मिळाले कोटींचे गिफ्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सैफ अली खान स्टारर आदिपुरुष या चित्रपटातील रावणाच्या लूकवरून सध्या बराच वाद सुरू आहे. या चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत करोडोंच्या गिफ्टमुळे चर्चेत आहेत.

आदिपुरुषच्या दिग्दर्शकाला करोडो रुपयांची कार भेट मिळाली आहे. टी-सीरीजचे मालक आणि आदिपुरुष निर्माते भूषण कुमार यांनी ओम राऊतला हे मोठे गिफ्ट दिले आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी कार्तिक आर्यनला अशीच एक अनमोल भेट दिली होती. ओम राऊत यांच्या आलिशान कारचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत असून चाहत्यांनी त्यांच्या कारला खूप पसंती दर्शवली आहे.

'फेरारी एफ8 ट्रिबुटो' (Ferrari F8 Tributo) असे या कारचे नाव असून त्याची किंमत 4.8 कोटींहून अधिक आहे. लाल रंगाची कार दिसायला अतिशय सुंदर आणि स्टायलिश आहे.

Adipurush Movie Cast

आदिपुरुषमध्ये प्रभास श्री रामच्या भूमिकेत असून सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. याची निर्मिती भूषण कुमार यांच्या टी-सीरिजने केली आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉन आणि सनी सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

450 कोटी बजेट असलेल्या आदिपुरुषचा टीझर रिलीज झाल्यानंतर वाद सुरू झाला आहे. यावरून सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. सैफ अली खानच्या लंकेश लूकबद्दल लोक खूप नाराज आहेत. या लूकची तुलना अलाउद्दीन खिलजीशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : गणेशोत्सवात लेझर बीम लाईटचा वापर, डीजेचा दणदणाट; पिंपरी चिंचवडमधील ४० मंडळांवर कारवाई

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात ही एक वस्तु दान करा; पैशांची तंगी आणि पितृदोष होतील दूर

Maratha/OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या जीआरवर भुजबळांची अॅक्शन, थेट फडणवीस सरकारवरच गंभीर आरोप, वाचा सविस्तर

Weight Loss Tips : हे कडधान्य रोज रात्री भिजवून खा अन् वजन कमी करा

Nepal Protest : नेपाळमध्ये अराजक स्थिती, भारतीयांसाठी मोदी सरकारकडून एडवायजरी, वाचा नेमकं काय सांगितलं

SCROLL FOR NEXT