Bhumi Pednekar  Instagram @bhumipednekar
मनोरंजन बातम्या

Bhumi Pednekar: उर्फीलाही भूमी पेडणेकरनं मागं टाकलं, बोल्डनेसमुळं अभिनेत्री होतेय ट्रोल

भूमी पेडणेकरचा लूक पाहून तिची तुलना उर्फी जावेदशी करण्यात येत आहे.

Pooja Dange

Bhumi Pednekar New Look: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर लवकरच आपल्याला 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. भूमी सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. भूमी चित्रपटासंबंधित अनेक इव्हेंट्समध्ये सहभागी होत आहे. भूमी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच भूमीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. भूमी पेडणेकरचा लूक पाहून तिची तुलना उर्फी जावेदशी करण्यात येत आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकर शेअर केलेल्या तिच्या फोटोमध्ये तिने नेव्ही ब्लू रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने या साडीवर मारून रंगाचा डिपनेक ब्लाऊज घातला आहे. या आऊटफिटवर भूमीने न्यूड मेकअप केला आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी भूमीने गळ्यात चोकर आणि हातात कडे घातले आहेत.

या फोटोमध्ये भूमी एकदम सिजलिंग अवतारात दिसत आहे. तिची नजर आणि अदा घायाळ करणारी आहे. भूमीचे चाहते तिची आणि तिच्या लूकची स्तुती करत आहेत तर काही लोक भूमीला या लूकमुळे ट्रोल करत आहते. भूमीच्या फॅशन सेन्सची तुलना चाहते अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेदशी केली जात आहे. एका नेटकाऱ्याने भूमीच्या पोस्टवर 'उर्फी जावेद २.०' अशी कमेंट देखील केली आहे. (Celebrity)

भूमी पेडणेकर 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. 'राक्षस', 'भीड', 'भक्षक', 'द लेडी किलर', 'अफ़वाह' आणि 'मेरी पत्नी' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समुद्रकिनारी आढळला पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह; मुंबईत खळबळ

Kalyan Shiv Sena : 'उद्याच २५ लाख दे, नाहीतर...' शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाणे जिल्ह्यात पुन्हा खळबळ

Accident : बॉलिवूड अभिनेत्रीचा परदेशात भयानक अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा दणका! गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर

Constant Fatigue And Headache: सतत थकवा अन् डोकेदुखी? 'हे' 6 बदल शरीरात दिसताच व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास पडेल महाग

SCROLL FOR NEXT