Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Box Office Collection: 'सिंघम अगेन की भुल भुलैया 3' कोण आघाडीवर? दोन दिवसांत कुणी किती कमावले?

Bhool Bhulaiyaa 3 VS Singham Again Box Office Collection Day 2: अजय देवगणचा सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 या दोन्ही अॅक्शनपट चित्रपटांनी दोन दिवसांतच बॉक्स ऑफिस गाजवलं आहे

Manasvi Choudhary

सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटांच्या कमाईचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशातच शुक्रवार १ नोव्हेंबर प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरला आहे. कारण दिवाळीसोबतच जगभरातील सिनेमागृहात दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ते म्हणजे अजय देवगणचा सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 या दोन्ही अॅक्शनपट चित्रपटांनी दोन दिवसांतच बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. दोन्ही चित्रपटांची पहिल्या दिवशी चांगली कमाई झाली आहे. यानुसार दोन्ही चित्रपटाचं कलेक्शन नेमकं किती आहे ते जाणून घ्या.

दिवाळीसह विकेंडला बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' आणि अजय देवगणचा मल्टीस्टारर ॲक्शन चित्रपट 'सिंघम अगेन' प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र, मात्र नेहमी दोनपैकी एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत पुढे आहे तर दुसरा मागे पडला आहे. दरम्यान दोन्ही चित्रपटांची दुसऱ्या दिवसांची कमाई किती

कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 35.50 कोटींची ओपनिंग केली. पण अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'पेक्षा तो मागे पडला. मात्र, दुसऱ्या दिवशी कार्तिकच्या चित्रपटाने 36 ते 37 कोटी रुपयांची कमाई केली 'भूल भुलैया 3'चे एकूण कलेक्शन आता 72.5 कोटी झाले आहे.

अजय देवगणच्या मल्टीस्टारर ॲक्शन चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि 43.50 कोटींची कमाई केली. मात्र, दुसऱ्या दिवशी हा चित्रपट स्वतःच्या ओपनिंगमध्ये मागे पडला. चित्रपटाने ओपनिंगच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी 2 कोटींची कमाई केली आहे. मात्र, पहिल्या दिवसापासून कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' च्या कमाईच्या बाबतीत सिंघम अगेन आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या दिवशीच्या म्हणजेच विकेंडच्या दिवशी दोन्ही चित्रपटांचे कलेक्शन किती होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT