Bhola Box Office Collection 1 Week Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhola Box Office Collection 1 Week: मरगळलेला ‘भोला’ विकेंडमध्ये सुसाट.. भोला ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

अजय देवगण आणि तब्बू प्रमुख भूमिकेत असलेले ‘भोला’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले असून सध्या दिलासादायक कमाई चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.

Chetan Bodke

Bhola Box Office Collection: अजय देवगण आणि तब्बू प्रमुख भूमिकेत असलेले ‘भोला’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. ‘भोला’ने पहिल्याच दिवशी १० कोटींची कमाई करत आपले खाते उघडले. तर, दुसऱ्या दिवशी त्याची कमाई घसरलेली दिसले. ‘भोला’ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई केली आहे. पण ‘भोला’ला शनिवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी खूप फायदा झाला. वीकेंडच्या निमित्त अजय देवगणच्या चित्रपटाने धुमाकूळ घातला. जाणून घेऊया ‘भोला’ने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा व्यवसाय केला?

अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि २०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. त्यानंतर अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘भोला’ चित्रपट थिएटरमध्ये पोहोचला आहे. प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडला आहे.

चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारी केवळ ७.४ कोटी कमावणाऱ्या ‘भोला’ने वीकेंडला जबरदस्त कमाई करत चांगले कलेक्शन केले आहे. चित्रपटाने शनिवारी १२.१० कोटींची कमाई केलेली आहे. वृत्तानुसार, ‘भोला’ने रविवारी बॉक्स ऑफिसवर १४ कोटींची शानदार कलेक्शन केले आहे. त्यानंतर आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४४.७० कोटी रुपये झाले आहे.

‘पठान’ नंतर ‘भोला’ हा वर्षातील तिसरा सर्वात मोठा ओपनर आहे. ‘पठान’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती, तर ‘तू झूठी मैं मक्कार’ने पहिल्या दिवशी १५.७३ कोटींची कमाई केली होती. तर ‘भोला’ने पहिल्याच दिवशी ११.२ कोटींचा व्यवसाय केला होता. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, ‘भोला’ने वीकेंडला चांगली प्रगती केली आहे, मल्टिप्लेक्सच्या तुलनेत छोट्या केंद्रांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

‘भोला’ चित्रपट साऊथचा चांगलाच यशस्वी झालेला चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. अजय देवगणने ‘भोला’ चित्रपटाचे दिग्दर्शन केला आहे. याआधी अजयने ‘यू मी और हम’, ‘शिवाय’ आणि ‘रनवे 34’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अजय देवगण आणि तब्बू सोबतच ‘भोला’मध्ये दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमला पॉल, गजराज राव सोबत इतर अनेक कलाकार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT