Yash Kumar Viral Photo Instagram/ @yashkumarr12
मनोरंजन बातम्या

Viral Photo: अभिनेत्याने दुसऱ्या पत्नीला दिला धोका? तिसऱ्या पत्नी आणि मुलासोबतचे फोटो व्हायरल

भोजपुरी अभिनेता यश कुमार नेहमीच आपल्या कृतींमुळे चर्चेत आहे. सध्या व्हायरल होत असणाऱ्या फोटोंप्रमाणे त्याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर बरीच होत आहे.

Chetan Bodke

Yash Kumar Viral Photo: भोजपुरी अभिनेता यश कुमार नेहमीच आपल्या कृतींमुळे चर्चेत आहे. सध्या व्हायरल होत असणाऱ्या फोटोंप्रमाणे त्याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर बरीच होत आहे. पहिले लग्न अंजना सिंगसोबत तर दुसरं लग्न लुलिया म्हणजेच निधी झासोबत त्याने केले होते. नेहमीच आनंदीत असणाऱ्या या जोडीच्या आयुष्यातच नक्की काय घडलं असा सवाल सर्वच विचारत आहे. अनेकदा यश पत्नी निधीसोबतचे काही फोटो शेअर करायचा पण त्यावर नेटकरी त्याला ट्रोल करायचे.

सध्या सोशल मीडियावर यश कुमारचा एक फोटो वाऱ्यासारखा तुफान व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो पाहून नक्कीच तुम्ही काही वेळ चकीत व्हाल. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये यश कुमार आणि प्रियंका रेवडीचा लग्नातील एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. लग्नानंतरचा या जोडीचा फोटो पाहिल्यावर त्यांच्या चेहेऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसून येत आहे.

यश कुमारने त्याच्या लग्नात कॅज्युअल कपड्यांवर हजेरी लावली होती, तर प्रियंकाने नवरीच्या कपड्यांमध्ये हजेरी लावली होती. सोबतच आणखी काही फोटो सोशल मीडियावर होत आहेत, ज्यामध्ये यशच्या मांडीवर एक लहान मुलगा दिसत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंवर जर आपण विश्वास ठेवला तर, नेटकऱ्यांनी यशवर बरीच टीका केली आहे.

जरी ही त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असली तरी, त्याने तिसरे लग्न केलेले नाही. यश कुमार आणि प्रियंका रेवडीचा येत्या काही दिवसांत एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सर्वगुण संपन्न' असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या हटक्या प्रमोशनमुळे सध्या चित्रपटाची बरीच चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जनआंदोलन

Shocking: बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी चोरी, घरफोडीचा बनाव रचला; मुलीच्या प्रियकरासोबतही..., महिलेने केलं भयंकर कांड

Shirdi : बॅनर फाडल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; फिर्याद देणाऱ्याचा कारनामा उघड, चारजण ताब्यात

Trambkeshwar Temple : कालसर्प पूजा ॲपच्या आडून भाविकांची लूट | VIDEO

Post Office Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT