Ajay Devgn Bheek Maango AndolanAndolan Saam TV
मनोरंजन बातम्या

Ajay Devgn Bheek Maango Andolan: अजय देवगण विरोधात भीक मांगो आंदोलन; संतापलेले नागरिक उतरले रस्त्यावर

Online Gaming Advertisement: नागरिक त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत. तसेच एका व्यक्ती या अभिनेत्या विरोधात भीक मांगो आंदोलन करत आहे.

Ruchika Jadhav

Nashik News: बॉलिवूड अभिनेता सिंघम म्हणून घराघरात पोहचलेला अजय देवगण सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झालाय. नागरिक त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत. तसेच एक व्यक्ती या अभिनेत्या विरोधात भीक मांगो आंदोलन करत आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Latest Ajay Devgn News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अजय देवगण हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि नावाजलेला चेहरा आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. कलाकारांनी एखाद्या वस्तूची जाहिरात केल्यावर चाहते त्या वस्तू वापरतात. अशात अजय देवगण सध्या त्याच्या ऑनलाइन गेमिंग अॅपमुळे वादाच्या विळख्यात सापडलाय.

अजय देवगणच्या या जाहिरातीमुळे नाशकात भीक मांगो आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनात एक व्यक्ती आपल्या दुचाकीवर बसलाय. त्याने हातात दोन बॅनर घेतलेत. एक बॅनर त्याने दुचाकीवर लावलंय. यावर त्याने अजय देवगणसाठी भीक मांगो आंदोलन! असं लिहिलंय. तसेच यावर फोन पे आणि गुगल पेचा क्रमांक देखील देण्यात आलाय.

नागरिकांना आपल्या आंदोलनाविषयी या व्यक्तीने एका माईकवर मोठ्या आवाजात माहिती दिलीये. त्याने म्हटलं आहे की, मी भीक मांगो आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलोय. हे पैसे मला अजय देवगणला द्यायचेत. त्याने ऑनलाइन गेमिंग अॅपची जाहिरात करणे थांबवावे.

अजयला पैसे हवे असतील तर मी त्याला ते भीक मागून देत आहे. मात्र हे पैसे देखील त्याला कमी पडले तर मी पुन्हा रस्त्यावर उतरत भीक मागेल. ही माझी गांधी स्टाईल विनंती आहे, असं या व्यक्तीने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT