Chala Hawa Yeu Dya Star Cast Instagram @dr.nilesh_sabale_official
मनोरंजन बातम्या

Famous Marathi Serial Off Air: ९ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप

Marathi Comedy Serial: गेली नऊ वर्षे १००० हून अधिक भाग केल्यानंतर आता 'चला हवा येऊ द्या' प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

Pooja Dange

Chala Hawa Yeu Dya Going Off Air:

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेली ९ वर्षे या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकारांना या कार्यक्रमामुळे खूप प्रसिद्धी मिळाली.

'लय भारी' चित्रपटाच्या वेळी रितेश देशमुखने मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी एक मंच असावा अशी कल्पना बोलून दाखवली होती. त्यानंतर प्रयोग म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि 'चला हवा येऊ द्या'ची गाडी सुसाट पळू लागली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निलेश साबळेने अगदी कमी वेळात कार्यक्रमासाठी कलाकारांची निवड केली. स्वतः कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन आणि दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली. गेली नऊ वर्षे १००० हून अधिक भाग केल्यानंतर आता 'चला हवा येऊ द्या' प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध टीव्ही चॅनेलवरील अनेक मालिका बंद करण्यात आल्या. या मालिकांचे टीआरपी कमी असल्याने चॅनेलने हा निर्णय घेतला होता. यात आता 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा देखील समावेश झाला आहे. (Latest Entertainment News)

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांनी या कार्यक्रमाकडे (Serial) पाठ फिरवली आहे. एकेकाळी प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम होता. पण कार्यक्रमात प्रेक्षकांना वैविध्य हवे होतो. त्यामुळे टीआरपी लिस्टमध्ये 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम खूप मागे पडला. नोव्हेंबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही.

मालिकाचे टीआरपी वाढावा यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. यासाठी या मालिकेत अनेक पर्व सुरु करण्यात आले. होऊ दे व्हायरल, सेलिब्रिटी पॅटर्न, लहान तोंडी मोठा घास असे विविध पर्व मालिकेत घेण्यात आले.

६-७ महिन्यांनी कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT