Bharti Singh Becomes Mother Saam Tv
मनोरंजन बातम्या

कॉमेडियन भारती सिंग बनली आई; घरी छोट्या पाहुण्याचे आगमन

भारती आपल्या प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसातही काम करत होती. त्यामुळं अनेक महिलांसाठी भारती आदर्श ठरली आहे.

Shivani Tichkule

मुंबई - अनेकांना पोट धरुन हसायला लावणारी कॉमेडी क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नेहमी चर्चेत असलेली कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आता आई बनली आहे. भारतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. भारती आपल्या प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसातही काम करत होती. त्यामुळं अनेक महिलांसाठी भारती आदर्श ठरली आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) आई-वडील होण्यासाठी खूप उत्सुक होते.

दरम्यान, हर्षने सोशल मीडियावर त्यांच्या प्रेंग्नेसी शूटच्या वेळीचा फोटो शेअर करून ही गोड बातमी दिली. ‘इट्स बॉय’ असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. तसेच या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

भारतीला मुलगा झाला असून रविवारी तिची प्रसूती झाली असल्याचं हर्षने सांगितलं आहे. भरती बराच काळ तिच्या प्रेग्नेंसीचा प्रवास आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत होती. गरोदर राहिल्यापासूनच भारती आई होण्यासाठी उत्सुक होती. आपल्या सोशल मीडियावर भारती नेहमी आपल्या बेबी बंपचे फोटो शेअर करत होती. तिचे बेबी बंपमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT