Rangoli Designs for Diwali 2022 Instagram/@rangoli_nation
मनोरंजन बातम्या

Rangoli Memes for Diwali 2022 | क्रिएटीव्हीटीला तोड नाही; भन्नाट मीम्सच्या रांगोळ्या पाहून चेहऱ्यावर येईल स्माईल

Rangoli Nation's collection of Pop Culture Rangoli designs: तुमची दिवाळी अधिक प्रेक्षणीय बनवायची असेल, तर फुल आणि पानांपासून मीम्स रांगोळी काढा.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे
3 Idiots Rangoli

'3 इडियट्स', फरहानचे अब्बा

रांगोळी सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही मोठे कष्ट घेण्याची गरज नाही. फक्त एक साधा इशारा द्या. सुशिक्षितांना नक्कीच समजेल. 3 इडियट्समध्ये एक सीन आहे ज्यामध्ये फरहानचे वडील म्हणतात, माझ्या मुलापासून दूर राहा. आता फरहानच्या वडिलांना तुमच्या रांगोळीत आणा आणि 'हाथ जोड़ के गुजारिश है आपसे दूर रहिए मेरी रंगोली से' असं म्हणा. (Diwali Memes Rangoli)

Akshay Kumar Rangoli

'फिर हेरा फेरी' राजू रांगोळी

फिर हेरा फेरीमध्यल्या राजूला कोण नाही ओळखत? अक्षय कुमारच्या या भन्नाट स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. राजूला बघूनही कोणी रांगोळी खराब करायला निघाले तर बाबुरावांच्या स्टाईलमध्ये म्हणायचं 'खोपडी तोड साले की'...

Majnu Bhai Painting Rangoli

मजनू भाईची चित्रकला

वेलकम चित्रपटातला मजनू भाई म्हणजे सॉल्लिड माणूस. भाई असूनही त्याचा चित्रकलेचा नाद सुटलेला नाही. गाढव आणि घोड्याचं प्रेम सांगणाही ही भन्नाट पेंटींग रांगळी स्वरुपात भारी दिसतेय.

Kalin Bhaiyya Dialogue Rangoli

कालिन भैया रांगोळी

मिर्झापूरच्या कालिन भैय्याचा प्रसिद्ध डायलॉग... सिंपल है यह इम्पॉर्टंट नही है, रंगोली है यह इम्पॉर्टंट है.

Manoj Bajpayee Dialogue Rangoli

'द फॅमिली मॅन' रांगोळी

आपली रांगोळी सर्वोत्कृष्ट असावी असे प्रत्येकाला वाटत असते, पण आपले काय होते, रांगोळी ही फक्त रांगोळी नसते हेही कळायला हवे. अशा परिस्थितीत, द फॅमिली मॅनचा प्रसिद्ध सीन ज्यामध्ये मिस्टरचा बॉस त्याला 'डोन्ट बी अ मिनिमम गाय' असं समजावून सांगतो.

Kalin Bhaiyya Dialogue Rangoli

कालिन भैया रांगोळी

मिर्झापूरच्या कालिन भैय्याला कोण ओळखत नाही? तुम्ही कोणत्या प्रकारची रांगोळी काढली आहे, असा प्रश्न करून कोणी तुम्हाला वारंवार त्रास देत असेल, तर त्यांना उत्तर देण्यासाठी ही सर्वोत्तम रांगोळी आहे. कोपऱ्यावर कालिन भैय्याचा फोटो चिकटवा आणि ''तो इसको देखने के लिए तुम हमारे दरवाजे पर चले आए'' असे लिहा.

Panchayat Dialogue Rangoli

'पंचायत'मधला नबरोबा

पंचायत या सिरीजमध्ये सेक्रेटरी वराचा अपमान करतानाचे एक दृश्य आहे. अशा स्थितीत या रांगोळीमध्ये तुम्ही आयकॉनिक सीन पुन्हा तयार करू शकता. ज्याला पाहून लोकं म्हणतील, "गजब रंगोली है यार..."

Yeh Jawaani Hai Deewani Dialogue Rangoli

6. 'ये जवानी है दिवानी', नैनाचा संवाद

ये जवानी है दिवानी या चित्रपटात नैना बनीला समजावून सांगते की बनी काहीही कर, पण आयुष्यात काहीतरी चुकतेच. आता मुलींनी अशी कल्पना करा की तुमचा एक भावनिक मित्र आहे. जो प्रत्येक वेळी रांगोळी काढतो आणि कुणातरी त्याची रांगोळी खराब करून पळून जातो, मग त्याच्यासाठी ही रांगोळी बनवा आणि मस्त लिहा, "जितना भी ट्राइ कर लो बनी कोई न कोई रंगोली बिगाड़ ही देगा..."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT