Khatron Ke Khiladi In Shiv Thakare Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare: शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी’ 13 साठी सज्ज; आईकडून औक्षण करुन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल...

शिव ठाकरे रोहित शेट्टीच्‍या ‘खतरों के खिलाडी’ 13 च्या माध्यमातून पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परत येणार आहे.

Chetan Bodke

Khatron Ke Khiladi In Shiv Thakare: ‘बिग बॉस 16’ फेम शिव ठाकरे नेहमीच चर्चेत असतो. कधी आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रेमामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. शिव ठाकरे ‘बिग बॉस 16’ हा रिॲलिटी शोची ट्रॉफी त्याला मिळू शकली नाही, पण त्याने त्याच्या साफ मनामुळे चाहत्यांची मने मात्र जिंकली. ‘बिग बॉस 16’ नंतर लवकरच आणखी एका रिॲलिटी शोचा हिस्सा होणार आहे. शिव ठाकरे रोहित शेट्टीच्‍या ‘खतरों के खिलाडी’ 13 च्या माध्यमातून पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परत येणार आहे.

या शोमध्ये शिव अनेक महत्वाचे टप्पे पार करत, कठीण शर्यती पार करत स्वत:ला सिद्ध करताना दिसणार आहे. या शोच्या माध्यमातून कधी तो उंचावरून लटकताना दिसेल तर कधी साप आणि मगरी यांच्यामध्ये स्टंटबाजी करताना दिसणार आहे. हे कठीण स्टंट पेलण्यासाठी शिव खुप उत्साहित देखील असून तो या शोसाठी पुर्णपणे तयार आहे. त्याने यासाठी खुप मेहनत देखील घेतली असल्याच त्याने सांगतिले आहे. त्याने यापुर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि आशीर्वाद देखील घेतले.

आता शिव ‘खतरों के खिलाडी’ 13 साठी सज्ज झाला असुन त्याचा प्रवास देखील सुरु झाला आहे. मात्र त्यापुर्वी त्याच्या आईचा आणि त्याचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात शिवची आई त्याचे औक्षण करत असून शिव आता आईचा आशीर्वाद घेवुन ‘खतरों के खिलाडी’चा 13 वा सिझन गाजवण्यासाठी निघाला आहे. त्याच्या चाहत्यांना तर पुर्णपणे विश्वास आहे की शिव हा शो नक्कीच जिंकणार आहे. तो आता शूटिंगसाठी सध्या रवाना होणार असून चाहते सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

शिवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, शिव यापूर्वी एमटीव्ही रोडिज, बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आणि बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या सीझनचा उपविजेता झाला होता. ‘बिग बॉस 16’ नंतर त्याच्याकडे आगामी चित्रपटांची भली मोठी यादी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT