Mohini Dey Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mohini Dey Divorce: 'आम्ही चांगले मित्र राहू, पण आयुष्यात...'; एआर रहमाननंतर मोहिनी डे ने घेतला पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय

Mohini Dey Divorce News: बॅसिस्ट मोहिनी डे यांनीही पतीपासून वेगळे होणार असल्याची पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावरील मोहिनी डेची पोस्ट सध्या लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

प्रसिद्ध संगीतकार ए. आर . रहमान नुकंतच यांनी पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. २९ वर्षानंतर त्यांनी हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. असे असताना आता ए. आर.रहमान यांच्या बँड ग्रुपमधील बॅसिस्ट मोहिनी डे यांनीही पतीपासून वेगळे होणार असल्याची पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावरील मोहिनी डेची पोस्ट सध्या लक्ष वेधून घेत आहे.

मोहिनी डे नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने, मी मित्र, नातेवाईक आणि चाहते यांनी कळवू इच्छिते की, मी आणि मार्क वेगळे होत आहोत, ही बातमी सांगताना दु:ख वाटत आहे. मात्र आम्ही दोघांनीही एकमताने हा निर्णय घेतला आहे. पुढे तिने, आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू, पण आयुष्यात काहीतरी वेगळे हवे आहे यामुळेच आम्ही हा निर्णय घेत पुढे जाण्याचा उत्तम मार्ग निवडला आहे.

वेगळे झाल्यानंतरही मोहिनी आणि मार्क प्रोजेक्टमध्ये एकमेकांना सहकार्य करतील असे तिने म्हटलंय. "आम्ही अद्यापही मामोगी, मोहिनी डे ग्रुपसह अनेक प्रकल्पांवर एकत्र काम करू.एकत्र विविध प्रोजेक्टवर काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि ते आम्ही पुढेही करतच राहू" असंही तिने पोस्टमध्ये म्हटलंय.

मित्र आणि चाहते आम्हाला पाठिंबा देतील अशी अपेक्षा तिने व्यक्त केलेय. आम्हाला सर्वांकडून प्रेम हवे आहे. तुम्ही आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल तुमचे आभारी आहे. तर आम्ही घेतलेल्या हा निर्णय सकारात्मकतेने घ्याल. हा आमच्या वैयक्तिक जीवनाचा आदर आहे. यामुळे कोणतेही गैरसमज होऊ देऊ नका असे तिने निवेदनात म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT