जियो रे बाहुबली...! बाहुबली चित्रपट मराठीमध्ये Saam Tv
मनोरंजन बातम्या

जियो रे बाहुबली...! बाहुबली चित्रपट मराठीमध्ये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

"बाहुबली": Baahubali या सिनेमाचे नाव घेतले की ‘स्वप्नवत’ असा एकच शब्द आठवत राहतो. दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला आणि सुपरस्टार प्रभासच्या अभिनयाने हा सजलेला चित्रपटाने सर्वांना अक्षरश: वेडच लावले आहे. उत्कृष्ट कथानक, तितकाच उत्कृष्ट अभिनय आणि तितकेच उत्कृष्ट निर्मिती मूल्य असलेला हा सिनेमा भारतीय चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरला आहे. आता हा सिनेमा तुम्हाला तुमच्या बोलीभाषेत म्हणजेच मराठी मायबोलीत बघायाळस मिळणार आहे.

होय, ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने स्वप्नवत असा हा सिनेमा मराठीमध्ये आणण्याचे शिवधनुष्य ठरवले आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठमोळ्या ‘बाहुबलीची कलात्मक जबाबदारी स्वीकारली आहे. तर अभिनेते डॉ. अमोल कोल्हे Dr. Amol Kolhe यांनी मराठी मधील बाहुबली या पात्राला आपला आवाज देण्यात आला आहे. देवसेनेच्या पात्राला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आवाज देण्यात आला आहे.

हे देखील पहा-

गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यासारखे अनेक नामवंत कलाकार या चित्रपटाकरिता मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. मराठमोळ्या बाहुबलीचे लेखन स्रेहल तरडे यांनी केले आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव गश्मीर महाजनी, कटप्पा उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज देण्यात आला आहे. कौशल इनामदार यांनी मराठमोळ्या बाहुबलीचे संगीत दिग्दर्शन केले आहे. तर गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे.

आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कºहाडे यांच्या आवाजात चित्रपटामधील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.आता हा मराठी ‘बाहुबली’कशी बघायला मिळणार तर दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच, गुरुवार ४ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ आणि सायंकाळी ७ या वेळेमध्ये शेमारू मराठीबाणा वाहिनीवर प्रेक्षकांना मराठी बाहुबली प्रसारित करणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Truck Collapsed : २५ फूट खड्ड्यात कोसळला PMC चा ट्रक; मैलापाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीकरताना दुर्घटना

Maharashtra News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणी दहा दिवसात कोट्यावधी रुपये अर्पण

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

SCROLL FOR NEXT