Badshah Post On Wedding Rumours Instagram @badboyshah
मनोरंजन बातम्या

Badshah Denies Wedding Rumours: तुम्ही अत्यंत बालिश आहात.. दुसऱ्या लग्नाच्या चर्चांवर रॅपर बादशाहची संतप्त प्रतिक्रिया

Wedding Rumours Of Badshah With GF Isha Rikhi: रॅपर बादशाहने रविवारी दुपारी इन्स्टाग्रामवर लग्नाच्या बातमीवर खुलासा केला.

Pooja Dange

Badshah Denied Wedding Rumours: गायक-रॅपर बादशाह नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे प्रकाश झोतात असतो. पुन्हा एकदा बादशाहची चर्चा होत आहे. यावेळी बादशाह चर्चेत येण्याचे कारण त्याची गाणी नसून त्याचे लग्न आहे. अलीकडेच बादशाह लग्न करणार बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. याविषयी खुद्द बादशाहनेच माहिती दिली आहे.

रॅपर बादशाहने रविवारी दुपारी इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नाच्या बातमीवर खुलासा केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून, त्याने स्पष्ट केले की त्याच्या लग्नाच्या बातम्या या अफवा आहेत. बादशहाने त्याच्या स्टोरीमध्ये लिहिले की, 'डिअर मीडिया, मी तुमचा आदर करतो पण हे अतिशय बालिश कृत्य आहे. मी लग्न करणार नाही. जो कोणी तुम्हाला ही बातमी देत ​​असेल त्याला आणखी चांगला बातम्या शोधायला सांगा, त्याची गरज आहे.

रॅपर बादशाहने संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी खूप मेहनत घेतली. बॉलिवूडमध्ये पाय रोवणं सोपं नसून इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला प्रेमाचा त्याग करावा लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बादशाह रिलेशनशिपमध्ये होता, परंतु त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला फक्त शोबिज इंडस्ट्रीचा भाग बनायचे होते म्हणून सोडले.

जेव्हा बादशाहचा ब्रेकअप झाला, तेव्हा त्याने संगीत जगतात प्रवेश केला, परंतु त्याला आज जे नाव आणि प्रसिद्धी मिळत आहे ती त्याने कामवाली नाही. करिअरमध्ये स्टेबल झाल्यानंतर बादशाहने 2015 मध्ये जस्मिनसोबत लग्न केले. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2019 मध्येच दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. एक लग्न मोडल्यानंतर बादशाहने दुसरे लग्न केले नाही.

Badshah Post On Wedding Rumours

'सॅटर्डे सॅटरडे' हे गाणे रिलीज झाल्यावर बादशाहने पहिल्यांदा प्रसिद्धी झोतात आला. हे गाणे त्याने गायले होते. यानंतर त्यांने 'डीजे वाले बाबू मेरा गाना बाजा दो', 'लडकी ब्यूटीफुल' अशी अनेक गाणी गायली, जी सुपरहिट झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT