Bad News Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bad Newz Collection : विकी- तृप्तीच्या ‘बॅड न्यूज’ची बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

Bad Newz Collection 1st Day Collection : कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असलेला विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टार ‘बॅड न्यूज’ चित्रपट काल (१९ जुलै) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे.

Chetan Bodke

विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टार ‘बॅड न्यूज’ चित्रपट काल (१९ जुलै) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असलेल्या ह्या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला फक्त प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून समीक्षकांकडून इतका खास प्रतिसाद मिळत नाही. पण तरीही देखील चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिलेला आहे.

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, ‘बॅड न्यूज’ चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच १९ जुलैला शुक्रवारी ८ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ८ कोटी ३० लाखांची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा हा आकडा दिलासादायक असून प्रेक्षकांकडून चित्रपटाचे चांगलेच कौतुक केले जात आहे. विकी कौशल, तृप्ती डिमरी, ॲमी वर्क, शिबा चढ्ढासह इतर कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे.

बुचकळ्यात पाडणारी कथा समीक्षकांना फारशी भावलेली नाही. वेगवेगळ्या गोष्टींची सर भेसळ असलेल्या कथानकाने समीक्षकांचा हिरमोड केलेला आहे. एका घरगुती कार्यक्रमामध्ये विकीची आणि तृप्तीची भेट होते.

पहिल्याच भेटीमध्ये दोघांचीही फ्रेंडशिप झाली. नंतर पुढे फ्रेंडशिपचं रूपांतर प्रेमात झालं. नंतर पुढे त्यांनी लग्नही केलं. लग्न केल्यानंतर काही महिन्यांतच विकीचा आणि तृप्तीचा घटस्फोट होतो.

घटस्फोट झाल्यानंतर तृप्ती मसुरीला जाते. तिथे गेल्यावर तिला ॲमी वर्क भेटतो. नंतर गोष्टी अशा घडतात की, सलोनीची एकाच रात्री गुरबीर आणि अखिलसोबत 'गडबड' होऊन ती गरोदर होते. टेस्ट केल्यावर होणाऱ्या बाळाचा नेमका बाप कोण? अखिल की गुरबीर? असा प्रश्न सलोनीसमोर उभा राहतो. मग पुढे कथानकात ट्विस्ट अँड टर्न येतो. मिश्किल कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT