Bad News Film  Instagram/ @vickykaushal09
मनोरंजन बातम्या

Bad Newz Collection : विकी कौशलचा ‘बॅड न्यूज’ बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप? दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा किती?

Bad Newz 2nd Day Collection : आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टारर चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Chetan Bodke

आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टार चित्रपट १९ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना भावले असून प्रेक्षकांकडून विकेंडला उत्तम कमाई करताना दिसत आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल...

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टनुसार, ‘बॅड न्यूज’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ८.३ कोटींची कमाई तर आता दुसर्‍या दिवशी १० कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने दोन दिवसांत १८.३ कोटींची कमाई केलेली आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हे प्रारंभिक आकडे आहेत. कमाईतही वाढ अपेक्षित आहे. चित्रपटाच्या कमाईमध्ये या विकेंडला आणखी कमाई होण्याची शक्यता आहेत.

विकी कौशल, तृप्ती डिमरी, ॲमी वर्क, शिबा चढ्ढासह अनेक कलाकार चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. इशिता मोईत्रा आणि तरुण दुडेजा यांनी लिहिलेला 'बॅड न्यूज' हा २०१९ च्या 'गुड न्यूज' फ्रेंचाइजी चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सलोनी बग्गा (तृप्ती डिमरी) हीच्या पोटात जुळी मुली आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे या मुलांना एक नाही तर दोन वडील (विकी आणि एमी) आहेत. आता या दोघांपैकी ती आपल्या मुलाचा बाप म्हणून कोणाची निवड करणार, याभोवतीच ही कथा फिरतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शाहू महाराजांचा मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा

भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; महिनाभर फक्त रितेश भाऊंचा बोलबाला, चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमावला?

RCB vs GT, IPL Final : प्रिन्स अन् किंग भिडणार... गुजरातच्या मैदानात आरबीसी कमाल करणार का? पाहा संभाव्य प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT