बचपन का प्यार फेम सहदेव झळकला बादशाह सोबत, गाणं रिलीज; पहा Video instgram/@BADSHAH
मनोरंजन बातम्या

बचपन का प्यार फेम सहदेव झळकला बादशाह सोबत, गाणं रिलीज; पहा Video

'बचपन का प्यार' या गाण्यातून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात लोकप्रिय झालेल्या सहदेव दिर्डोचा पहिले अधिकृत गाणे रिलीज झाले आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: 'बचपन का प्यार' Bachpan Ka Pyar या गाण्यातून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात लोकप्रिय झालेल्या सहदेव दिर्डोचा पहिले अधिकृत गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे प्रसिद्ध रॅपर बादशाहने Badshah तयार केले आहे. सहदेव सोबतच्या या गाण्याचे शीर्षकही Tital 'बचपन का प्यार' असे ठेवण्यात आले आहे. हे गाणे रॅपच्या माध्यमातून लहानपानापासून ते तारुण्यापर्यंतची एक प्रेमकथा दर्शवते. या गाण्याबद्दल बराच काळ सोशल मीडियावर Social Media चर्चा होती. शेवटी हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

'बचपन का प्यार' या गाण्यात सहदेवने बादशहासोबत सादरीकरण केले आहे. गाणे रिलीज होऊन थोडा वेळ झाला आहे आणि ते यूट्यूबच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये नंबर 1 वर आले आहे. सहदेव, बादशाह व्यतिरिक्त हे गाणे आस्था गिल आणि रिको यांनी एकत्र गायले आहे. या गाण्याचे बोल बादशाहने लिहिले आहेत. बादशाहने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हे गाणे रिलीज केले आहे.

'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरडो छत्तीसगडच्या सुकमाचा रहिवासी आहे. त्याच्या गाण्यांवर अनेक रील Reels देखील बनवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बादशहाने इंडस्ट्रीला अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यापैकी डीजे वाले बाबू, वखरा स्वॅग, चुल, स्टारडे, मूव्ह योअर लक, हॅपी हॅपी खूप प्रसिद्ध झाले. अलीकडेच त्याचे आणि जॅकलिनचे पाणी-पानी गाणे रिलीज झाले जे श्रोत्यांकडून खूप पसंत केले गेले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farhan Akhtar: फरहान अख्तरने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना तब्येतीची काळजी घ्यावी लागणार, वाचा राशीभविष्य

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार १० पदरी, प्रवास होईल आणखी सुसाट; काय आहे मेगाप्लान?

Dev Diwali 2025 date: कधी आहे देव दिवाळी? पृथ्वीवर येऊन देवता साजरी करणार दिवाळी, वाचा कथा

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे आदेश

SCROLL FOR NEXT