Babil Khan At IIFA 2023 Instagram @iifa
मनोरंजन बातम्या

Babil Khan at IIFA 2023 Awards: बाबिल खान ठरला 'बेस्ट डेब्यूटन्ट ऑफ इयर', या खास क्षणी घातला होता वडिलांचा सूट

Babil Khan Received Best Debutant Award: 'सर्वोत्कृष्ट नवोदित ऑफ द इयर' पुरस्काराने बाबिलला सन्मानित करण्यात आले.

Pooja Dange

Babil Khan Received Best Debutant Award For Qala : 'काला' या सायकॉलॉजिकल सीरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा अभिनेता बाबिल खान नुकताच आयफा अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान, त्याचे वडील दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा सूट बाबिलने घातला होता. या अवॉर्ड शोमध्ये त्याला 'सर्वोत्कृष्ट नवोदित ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संजय लीला भन्साली यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता शंतनू महेश्वरीसोबत त्याने हा पुरस्कार शेअर केला. या खास प्रसंगी, अभिनेता म्हणाला, “वैयक्तिकरित्या जिंकण्यापेक्षा एकत्रितपणे जिंकण्याचा आनंद नेहमीच मोठा असतो, मी अत्यंत कृतज्ञ आहे की मला हा प्रतिष्ठित पुरस्कार शंतनूसोबत शेअर करायला मिळाला.

'कला' ची कथा सीरीजच्या मुख्य अभिनेत्रीभोवती फिरते. जिच्यासोबत लहानपणापासूनच तिची आई भेदभाव करते आणि तिला मानसिक त्रास होतो. यामुळे ती खूप अस्वस्थ होते आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांशी लढत असते.

मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो हे या सीरीजमध्ये दाखविण्यात आले आहे. काला नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाली आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा खूप मनोरंजक आहे. या मालिकेत बाबिल खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. या पात्रासाठी बाबिलचे अभिनेत्याने खूप कौतुक झाले.

पुरस्कार मिळाल्यानंतर बाबिलने संपूर्ण टीमचे आभार मानले. बाबिल म्हणाला की, "होय, मी संपूर्ण कला टीमचे विशेषत: अन्विता, क्लीन स्लेट, अनुष्का शर्मा, तृप्ती, स्वस्तिका आणि चित्रपटाशी संबंधित सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही संधी दिली.”

बाबिल पुढे म्हणाला, “हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी एक उत्सव नाही, तर मला मिळालेल्या पाठिंब्याचा आणि आणि प्रेमाचा दाखला देखील आहे. अन्विता दत्त दिग्दर्शित 'कला' मध्ये तृप्ती डिमरी, स्वस्तिका मुखर्जी, अमित सियाल आणि समीर कोचर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'कला' OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमसाठी उपलब्ध आहे.

बाबिलने त्याच्या करियर सुरुवात मॉडेलिंग केली आहे. 'लकमे फॅशन वीक'मध्ये बाबिलने रॅम्प वॉक केला होता. तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. बाबिल वडिलांना विसरलेला नाही. तो इरफान खानच्या अनेक आठवणी नेहमी शेअर करत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT