Autograph Film Released Television Saam Tv
मनोरंजन बातम्या

Autograph Released Televison: टेलिव्हिजनच्या इतिहासात घडणार नवा प्रयोग, 'ऑटोग्राफ' थिएटरमध्ये नाही तर टेलिव्हिजनवर होणार प्रदर्शित...

पहिल्यांदाच ऑटोग्राफ हा सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या आधी टेलिव्हिजनवर प्रदर्शित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Autograph Film Released Television: प्रेमापेक्षा नातं महत्वाचं...कारण प्रेम एकवेळ संपेल पण नातं... ते कायमच असतं.... अशीच एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी म्हणजे ऑटोग्राफ सिनेमा. एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांची ही कथा आहे. सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर, मानसी मोघे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलीय.

सर्वात महत्त्तवाची गोष्ट म्हणजे हा मचअवेटेड सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या अगोदर स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल. रविवार १४ मेला दुपारी १ वाजता घरबसल्या प्रेक्षकांना या अनोख्या लव्हस्टोरीचा आनंद घेता येईल. पहिल्यांदाच हा नवाकोरा सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या आधी टेलिव्हिजनवर प्रदर्शित होत आहे. (Marathi Film)

ऑटोग्राफ चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे चित्रपटाविषयी सांगतात, ‘लव्हस्टोरी करायला एक वेगळीच मजा असते. प्रत्येक लव्हस्टोरी आपल्याला कुठेतरी आपलीच आहे असं भासवते आणि म्हणूनच ती प्रत्येकाच्या मनाला भिडते. ऑटोग्राफ सुद्धा अशीच एक लव्हस्टोरी आहे . जगातला प्रत्येक माणूस या अश्या प्रवासातून गेलाय पण याचा शेवट मात्र अनुभवण्यासारखा आहे. दिग्दर्शक म्हणून मला तो फार आवडलाय आणि मला खात्री आहे रसिकांना सुद्धा तो नक्की आवडेल. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय याचा अतिशय आनंद होतोय.’

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT