Atithi Bhooto Bhava Poster  Instagram/ @pratikgandhiofficial
मनोरंजन बातम्या

Atithi Bhooto Bhava: हॉरर कॉमेडी 'आतिथी भूतो भव:' चा ट्रेलर आला; एकदा बघाच!

चित्रपटाची कहाणी इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळी असून मनोरंजक आहे. सोबतच चित्रपटात मनोरंजक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ओटीटीची (OTT) वाढती लोकप्रियता पाहता दिग्दर्शक प्रेक्षकांसाठी नेहमीच काही तरी वेगळे घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतात. ओटीटीचा वाढता विस्तार पाहता आणि ओटीटीवर चित्रपटाची वाढती मागणी पाहता काही चित्रपट प्रदर्शित होताच पुढच्या काही दिवसांतच ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. लवकरच आणखी एक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच 'आतिथी भूतो भव:' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (Atithi Bhooto Bhava Movie Trailer out) झाला आहे. चित्रपटात अभिनेता प्रतिक गांधी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

दिग्दर्शक हार्दिक गज्जर (Director Hardik Gajjar) यांचा 'आतिथी भूतो भव:' हा हॉरर कॉमेडी चित्रपट (Horror Comedy) आहे. चित्रपटाची कहाणी इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळी असून मनोरंजक आहे. सोबतच चित्रपटात मनोरंजक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. श्रीकांत शिरोडकर नावाची भूमिका प्रतिक साकारत आहे. प्रतिक गांधी सोबतच चित्रपटात मुख्य भूमिकेत जॅकी श्रॉफ, शर्मिन सेगल, सुनिल शक्य, दिवीना ठाकूर हे कलाकार आहेत.

चित्रपटाविषयी अभिनेता जॉकी श्रॉफ म्हणाला, 'मी अनेक मोठ्या भूमिका केल्या आहेत. परंतु, 'आतिथी भूतो भव:' मधील माखन सिंगची भूमिका वेगळी आहे. भूताचे चित्रण करणे खूप रोमांचक होते. मला आशा आहे की प्रेक्षकांनाही तेवढाच आनंद होईल जेवढा आम्हाला चित्रपट बनवताना आनंद होत होता.' तसेच चित्रपटाविषयी प्रतिक गांधी सांगतो, ''अतिथी भूतो भव:' हा एक मनोरंजक चित्रपट आहे. कथानकाची वेगळी मांडणी असल्याने मी हा चित्रपट करायचे ठरवले. 'अतिथी भूतो भव:' हा एक हलका फुलका रोमँटिक संगीतमय चित्रपट आहे. जो प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवेल.'

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हार्दिक गज्जर म्हणतात, 'चित्रपट खरोखर माझ्या हृदयाच्या जवळ आहे. चित्रपटातील विषय महत्वपूर्ण आहे. आपले विचार व्यक्त करण्यासाठी असंख्य व्यासपीठ आहेत. तेव्हा आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची गरज आहे. प्रेमाची शक्ती जीवन आणि मृत्यूच्या पलीकडे असते. यावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट २३ सप्टेंबरपासून ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Edit By- Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Split : भाजपमध्ये फूट, आता नवनिर्वाचित महापौरांसह बंडखोरांवर कारवाई होणार? प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

Court Marriage Document: कोर्ट मॅरेज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? जाणून घ्या संपूर्ण यादी

Maharashtra Live News Update: परभणीत चालत्या ईर्टीगा गाडीने घेतला पेट

Akola : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या त्या नेत्याची सुरक्षा वाढवली, कारण काय?

EPFO Update: EPFO कडून महत्वाची घोषणा! PF खात्यावर मिळणार मोठं व्याज, कर्मचाऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT