Athiya- K.L.Rahul Wedding Athiya shetty Instagram
मनोरंजन बातम्या

Athiya- K.L.Rahul Wedding: राहुल-आथिया लग्नात माध्यमांसोबत साधणार संवाद, सुनील शेट्टींनी दिली महत्वाची महिती...

अभिनेते सुनील शेट्टींनी लेकीच्या लग्नाच्या एक दिवस आधी मराठीत महत्वाची माहिती दिली आहे.

Chetan Bodke

Athiya- K.L.Rahul Wedding: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होत आहे, अखेर ते लग्न लवकरच मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार आहे. लवकरच के. एल. राहुल आणि आथिया शेट्टी लग्न बंधनात अडकणार आहे. दोघेही आज अर्थात २३ जानेवारीला लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नाच्या मंडपाचे सध्या फोटो चांगलेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेते सुनील शेट्टींनी लेकीच्या लग्नाच्या एक दिवस आधी मराठीत महत्वाची माहिती दिली आहे.

सुनिल शेट्टींच्या खंडाळ्यातील घराबाहेर काही पापराझी जमले. त्या वेळी सुनील शेट्टी येत त्यांनी पापराझींसोबत संवाद साधला. त्यावेळी सुनील यांनी मराठीत संवाद साधला होता. सुनील माध्यमांसमोर येत म्हणतात, ‘लग्नाच्या दिवशी मी मुलांना समोर घेऊन येईल. तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद. २३ तारखेला अथिया आणि राहुल सर्वांसमोर येणार आहेत त्यावेळी त्यांना जे विचारायचंय ते विचारा…’

२१ तारखेपासून मोठ्या धुमधडाक्यात त्यांच्या लग्नाची जय्यत सुरुवात झाली असून २३ ला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नासाठी फक्त १०० पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे. अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीमध्ये सलमान खान, विराट कोहली, अनुष्का शर्मा, जॅकी श्रॉफ पासून अक्षय कुमार पर्यंत सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. पण लग्नात हजर राहणाऱ्या सेलिब्रिटींना काही अटींचं पालन करावं लागणार आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचं लग्न खंडाळ्यात होणार ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांच्या या खंडाळ्यातील बंगल्यात हे जोडपं सात फेरे घेत लगीनगाठ बांधणार आहे.

या दोन्ही लव्हबर्ड्चे लग्न अतिशय भव्य दिव्य पद्धतीने होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाहुण्यांना लग्नात फोटो काढता येणार नाहीत. या लग्नसोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांना फोन न वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

लग्नाला मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या काही आठवड्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मोठ्या पार्टीचं आयोजन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू

राज्यात आज 'ड्राय डे', मद्यपींचे वांदे होणार! २२ हजार हॉटेल-बार आज बंद, सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुडणार

MHADA Lottery 2025: खुशखबर! म्हाडाची तब्बल ५२८५ घरांसाठी लॉटरी, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु, कुठे कराल अर्ज?

Monday Horoscope : भगवान गणेशाची उपासना फलदायी ठरेल, अचानक धनलाभ होईल; ५ राशींच्या लोकाचं नशीब फळफळणार

Success Story: वडील वीट भट्टीवर कामाला; लेक २२ व्या वर्षी IPS झाला; सफीन हसन यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT