Athiya-KL Rahul  Instagram @athiyashetty
मनोरंजन बातम्या

Athiya-KL Rahul Wedding:अथिया- केएल राहुलला दिल्या मान्यवरांनी शुभेच्छा, कलाकारांसह क्रिकेट जगतातील दिग्गजांनी केला कमेंटचा वर्षाव...

अथिया आणि केएल राहुल लग्न होताच त्यांचे फोटो सोशल मीडिया शेअर केले.

Pooja Dange

Celebrity Comment On Athiya-KL Rahul Wedding Post: बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल यांचा काल म्हणजे २३ जानेवारी विवाह सोहळा पार पडला. त्यांचा हा लग्नसोहळा सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊस संपन्न झाला. हा सोहळा दोन्ही कुटुंबियांच्या जवळचे नातेवाईक आणि मित्र-मंडळी अशा १०० लोकांच्या उपस्थित पार पडला.

अथिया आणि केएल राहुल यांचे लग्न काल संध्याकाळी चार वाजता झाले. अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. अथिया आणि केएल राहुल लग्न होताच त्यांचे फोटो सोशल मीडिया शेअर केले. त्यानंतर त्याच्या फोटोंवर अनेक कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

बॉलीवूड कलाकार देखील अथिया आणि केएल राहुलला भरभरून शुभेच्छा देत आहेत तसेच त्याचे अभिनंद सुद्धा करत आहेत. विक्की कौशल, सोनू सूद, कार्तिक आर्यन, परिणीति चोपडा, अहान शेट्टी, काजोल, आलिया भट्ट, गुरू रंधावा, रकुलप्रीत, वाणी कपूर, हूमा कुरैशी, करण जौहर, मौनी रॉय अशा सर्व बॉलीवूड हस्तींनी या नवं वधु-वराला आशीर्वाद दिले आहेत.

केएल राहुलच्या पोस्टवर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, चहलची पत्नी धनश्री वर्मा, क्रुणाल पंड्या, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, सानिया मिर्जा, रोहित शर्माची पत्नी रितिका यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अथिया आणि केएल राहुल एकमेकांना ३ वर्षापेक्षा जास्त काळापासून डेट करत आहेत. आता दोघेही लग्नबंधनात आहेत. त्याचे लग्न अगदी खासगीत झाले. लग्नात पाहुण्याच्या फोन वापरण्याची परवानगी नव्हती. लग्नात साऊथ इंडियन पदार्थ ठेवण्यात आले होते आणि केळ्याच्या पानावर जेवण वाढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT