Ashok Saraf-Nivedita Saraf Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf-Nivedita Saraf: 'लेकीकडचं गणपती दर्शन' अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनी घेतलं सायली संजीवच्या बाप्पाचं दर्शन

Ashok Saraf-Nivedita Saraf Took Sayali Sanjeev Ganpati Darshan: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी अभिनेत्री सायली संजीवच्या बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

Manasvi Choudhary

मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ कायमच चर्चेत असतात. सध्या सर्वत्र गणेशोत्सव या सणाची धामधूम सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी बाप्पााच्या दर्शनासाठी भेटी देत आहेत. नुकतंच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी अभिनेत्री सायली संजीवच्या बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी सायली संजीवच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले आहे. सोशल मीडियावर निवेदिता सराफ यांनी सायलीसोबतचा सुंदर फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत निवेदिता सराफ यांनी,'लेकीकडचं गणपती दर्शन' असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर निवेदिता सराफ यांच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

निवेदिता सराफ यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर चाहत्यांनी लाईक्स करत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे सायली संजीवला त्यांची मुलगीच मानतात. निवेदिता यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी, "तुमच्यासारखीच दिसते, तर आणखी खरंच तुमची मुलगी वाटते.., लाडाची लेक" अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अशोक सराफ आणि सायली संजीव यांच नातं काय?

अभिनेत्री सायली संजीव ही अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना आई- वडील मानते. 'काहे दिया परदेस' या मालिकेत अशोक सराफ हे सायलीला त्यांची लेक मानू लागले. सुरूवातीला 'काहे दिया परदेस' मालिकेचा प्रोमो पाहून सायली संजीव ही निवेदिता सराफ यांच्यासारखी दिसते असे प्रोमो पाहून सर्वच बोलू लागले. दरम्यान सगळीकडे सायली ही तुमची मुलगी आहे अशी चर्चा रंगली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT