Ashish Vidyarthi Honeymoon Instagram
मनोरंजन बातम्या

Ashish Vidyarthi Honeymoon : ६० वर्षीय अभिनेता सिंगापूरला गेला बायकोसोबत हनिमूनला, नेटकरी म्हणाले...

Ashish Vidyarthi And Rupali Barua Photos: लग्नाच्या काही दिवसानंतर आशिष विद्यार्थी आणि पत्नी रुपाली हे दोघेही सिंगापूरला हनिमूनसाठी गेले आहेत.

Chetan Bodke

Ashish Vidyarthi News: बॉलिवूडचा खलनायक आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी आसामच्या रुपाली बरुआशी लग्नगाठ बांधली आहे. आशिषने रुपालीसोबत रजिस्टर मॅरेज केलं आहे. अभिनेत्यानं हे दुसरं लग्न केलं आहे. लग्नाच्या काही दिवसानंतर आशिष विद्यार्थी आणि पत्नी रुपाली हे दोघेही सिंगापूरला हनिमूनसाठी गेले आहेत. अभिनेत्याने त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत दोघेही एक स्मित हास्य देत फोटो शेअर केले आहेत.

आशिष विद्यार्थी यांनी फोटो शेअर करत कॅप्शन दिले की, ‘धन्यवाद मित्रा, तुझं प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.. आयुकरण बंधू... अलशुकरण जिंदगी. या सुंदर फोटोसाठी टिनटिनचे आभार.’ (Bollywood Film)

पोस्टवरील चाहत्यांच्या कमेंट्स पाहून नेटकरी म्हणतात. एक चाहता म्हणतो, ‘ऑल द बेस्ट. मेड फॉर इच अदर.’ तर आणखी एक म्हणतो, ‘सुंदर फोटो, आनंदी जोडपे, क्यूट स्माईल.’ तर आणखी एक म्हणतो, ‘सुंदर फोटो. तुम्हाला आशिर्वाद.’ तर आणखी एक म्हणतो, ‘क्यूट फोटो’ तर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्या फोटोचे कौतुक केले. (Bollywood Actor)

काही आठवड्यांपूर्वी आशिष विद्यार्थीने एक इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले होते. व्हिडिओमध्ये आशिष विद्यार्थी म्हणतात, “मी माझी पत्नी राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीशी घटस्फोट घेतला. पण त्यानंतर मला कुठेतरी असं वाटतं होतं की मी पुन्हा लग्न केले पाहिजे. कारण माझ्या आयुष्याचा उर्वरित प्रवास मी जोडीदाराबरोबर करायला हवा, असं माझ्या मनाला वाटत होतं. मी याबद्दल विचार करायला लागलो. हा विचार करताना मी ५५ वर्षांचा होतो आणि मला पुन्हा लग्न करायचं यावर मी ठामपणे निर्णय घेतला.” (Bollywood Actress)

“त्यानंतर मग माझ्या आयुष्यात रुपाली बरुआ आली. आम्ही एकमेकांशी चॅट करायला लागलो. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटलो. यानंतर मग आम्हाला आमच्या नात्यात मैत्रीपलीकडे काहीतरी आहे, असे जाणवलं. त्यावेळी आम्ही आयुष्यात पती-पत्नी म्हणून एकत्र येऊ शकतो, असं आम्हाला वाटले आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.” असे त्यांनी या व्हिडीओत म्हटले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने पुन्हा गेवराईच्या शिंगरवाडीत थोपटले दंड.

Kangana Ranaut : कंगना रनौतला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, नेमकं काय आहे प्रकरण?

Sushila Karki : सुशीला कार्की होणार नेपाळच्या हंगामी पंतप्रधान; रात्रीच घेणार शपथ, हालचालींना वेग

Uddhav Thackeray: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक सामना? उद्धव ठाकरेंचा संताप, जिल्हाप्रमुखांना दिल्या 'या' सूचना|VIDEO

Saturday Horoscope : राग राग न करता शांत राहून कामे करावी लागणार; ५ राशींच्या लोकांची चिडचिड वाढणार

SCROLL FOR NEXT