Aarya 3 Look In Sushmita Sen  Instagram/ @sushmitasen47
मनोरंजन बातम्या

Aarya 3 Teaser: डोळ्यावर गॉगल, हातात सिगार, सुश्मिताचा 'आर्या ३'मधील डॅशिंग लूक

सुष्मिता सेनच्या आगामी वेब सीरिजचा 'आर्य सीझन 3' चा पहिला टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Chetan Bodke

Aarya 3 Teaser: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या 'आर्या' सीरिजचे दोन्ही सीझन OTT प्लॅटफॉर्मवर प्रचंड हिट ठरले. या सीरिजच्या तिसर्‍या भागाची अनेक दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. नुकताच सुष्मिता सेनच्या आगामी वेब सीरिजचा 'आर्य सीझन 3' चा पहिला टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमध्ये सुष्मिता एका दमदार भूमिकेत दिसत आहे.

नुकताच टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्या टीझरमध्ये सुष्मिता सिगार पेटवताना आणि तिची पिस्तूल लोड करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर टीझर व्हिडिओ शेअर करत सुष्मिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, "ती परत आली आहे आणि ती म्हणजे व्यवसाय. #HotstarSpecials #Aarya3 आता शूटिंग सुरु असून लवकरच तुमच्या भेटीला येईल." टीझरमध्ये सुष्मिता काळ्या फुल स्लीव्ह टॉप आणि मोठा सनग्लासेस घातला असून सिगार ओढताना दिसत आहे.

'आर्य सीझन 3' साठी चाहते उत्सुक आहेत 'आर्य सीझन 3' चा पहिल्या टीझरचा व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. चाहते आर्याच्या तिसऱ्या सीझनसाठी फारच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. एक युजर कमेंट करत म्हणतो, 'मी नवीन सीझनसाठी खूप उत्सुक आहे.' तर आणखी एक म्हणतो, "मी या सीझनची वाट पाहत होतो. किलर." तर आणखी एक युजर म्हणतो, "वाह सुपर."

सुष्मिताने जून 2020 मध्ये 'आर्य' मधून ओटीटीमध्ये पदार्पण केले होते. या वेबसीरिजमध्ये सुष्मिताने अतिशय सशक्त भूमिका साकारली आहे, जी आपल्या कुटुंबाला गुन्हेगारीच्या जगापासून वाचवण्यासाठी काहीही करायला तयार असते. या मालिकेत सिकंदर खेरचीही प्रमुख भूमिका आहे.

या वेबसीरिजच्या दोन्हीही सीझनला समीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पहिल्या सीझनला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी नामांकन मिळाले होते. राम माधवानी दिग्दर्शित या मालिकेत नमित दास, मनीष चौधरी आणि विनोद रावत यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT