Arshad Warsi Spoke About Salman Khan  Instagram @arshad_warsi
मनोरंजन बातम्या

Arshad Warsi Replaced In Bigg Boss : 'बिग बॉस'मधून रिप्लेस झालेल्या अरशद वारसीने सोडले मौन ; म्हणाला सलमान खान...

Arshad Warsi On Salman Khan : चौथ्या सीझनपासून सलमान खान हा शो होस्ट करत आहे.

Pooja Dange

Arshad Warsi Spoke About Salman Khan : बिग बॉस एक पॉप्युलर रिअॅलिटीआहे. या शोचे सूत्रसंचालन गेली अनेक वर्ष सलमान खान करत आहेत. परंतु जेव्हा शो सुरु झाला तेव्हा या शोचा होस्ट अरशद वारसी होता. त्याला दुसऱ्या सीजनमध्ये रिप्लेस करण्यात आलं. आता इतक्या वर्षानंतर अरशद वारसाने यावर मौन सोडले आहे.

बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये अरशद वारसीच्या जागी शिल्पा शेट्टी दिसली होती. तर अमिताभ बच्चन यांनी तिसरे सीजन होस्ट केले होते. त्यानंतर चौथ्या सीझनपासून सलमान खान हा शो होस्ट करत आहे. अरशदने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे की, तो लंडनला शूटिंगसाठी गेला होता त्यामुळे तो दुसरा सीझन होस्ट करू शकला नाही. (Latest Entertainment News)

सलमान खानबद्दल बोलताना अर्शद वारसी म्हणाला की, तो या शोसाठी सर्वोत्कृष्ट आहे. सलमानपेक्षा चांगली कामगिरी कोणीच करू शकले नसते. रिअॅलिटी शोमध्ये सलमानसारख्या दबंगची गरज असल्याचेही अर्शद म्हणाला.

या मुलाखतीत अरशद वारसीने 2017 च्या जॉली एलएलबी 2 या चित्रपटात रिप्लेस केल्याबद्दलही बोलले आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अरशद दिसला होता, मात्र दुसऱ्या भागात अक्षय कुमार दिसला होता. अरशदने याबाबत सांगितले की, पहिल्यामध्ये काम करावे आणि अक्षयने दुसऱ्यामध्ये काम करावे, असे नियोजन होते. आता या चित्रपटाचा तिसरा भागही तयार होत आहे, ज्यामध्ये तो आणि अक्षय दोघेही एकत्र दिसणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मात्र, काही काळापासून अरशद त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'असुर 2' या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. ही बहुप्रतिक्षित मालिका १ जूनपासून जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे. असुरचा पहिला भाग 2017 मध्ये आला होता, जो प्रेक्षकांच्या पंसंतीस पडला होता. दुसऱ्या भागालाही पहिल्या भागाप्रमाणेच प्रेम मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 Wishes: गुढीपाडवा आला! प्रियजनांना पाठवा हे खास मेसेज; मराठी, हिंदी, इंग्रजी WhatsApp स्टेटस वाचा एका क्लिकवर

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! घिरट्या घालत हॅलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं; दुर्घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून आमदार जयंत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने-सामने

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून सुरू होतंय विक्रम संवत 2083; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

Sakharechi Mal Recipe: गुढी पाडव्यासाठी साखरेची माळ घरी कशी बनवायची? सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT