salman khan and arjun kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor : अर्जुन कपूरने केले भाईजानचे कौतुक; म्हणाला, ‘सलमान खूप प्रेमळ... ’

Arjun Kapoor : अर्जुन कपूरने सलमान खानचे कौतुक केले आहे. सलमान खान खूप प्रेमळ असल्याचे सांगून तो करत असलेल्या जनसेवेची प्रशंसा अर्जुन कपूरने एका मुलाखतीत केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Arjun Kapoor : अभिनेता अर्जुन कपूरने भाईजान सलमान खानला इंडस्ट्रीमध्ये किती महत्व दिले जाते. याबद्दल एका मुलाखतीत सविस्तर मत व्यक्त केले आहे. सलमान खानच्य कामामुळे त्याचे प्रेक्षक टिकवून ठेवल्याबद्दल त्याचे कौतुक अर्जुनने केले. अर्जुन कपूरने शेअर केले की सलमान खान निश्चितच गुंडगिरी करणारा नाही आणि तो खूप प्रेमळ व्यक्ती आहे.

काय म्हणाला अर्जुन

अर्जुन म्हणाला, "सलमान खान गुंडगिरी करणारा नाही. फक्त तो दिसायला कठोर दिसतो. कोणत्याही व्यक्तीला लोकांमध्ये रुळायला वेळ लागते सलमान खान त्यापैकी एक आहे सुरुवातीला तो तुमची खूप टर खेचले मस्करी करेल पण मुळात सलमान खान खूप प्रेमळ आणि काळजी करणारा व्यक्ती आहे.

‘तो जनतेसाठी काम करतो’

सलमानच्या कारकिर्दीबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, "त्याने नेहमीच चित्रपटाकडे प्रेक्षकांचे माध्यम म्हणून पाहिले आहे, तो जनतेसाठी काम करतो. त्याने प्रेक्षकांसाठी खूप काम केले आहे आणि त्याने स्वतःचा लॉयल फॅन बेस तयार केला आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याला नेहमी सहकार्य करतात. सलमान खान सलीम-जावेदच्या संगतीत वाढला आहे म्हणून तो अँग्री यंग मॅन दिसतो पण मुळात सलमान खूप भावुक व्यक्ती आहे.

अर्जुन कपूर सलमानच्या 'वॉन्टेड' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक होता. अर्जुनचे सलमानचा भाऊ अरबाज खानच्या मलायका अरोरासोबतही रिलेशनशिपमध्ये होता. त्याच्या 'तेवर' चित्रपटातील 'सुपरमॅन', 'सलमान का फॅन' हे गाणे देखील या अभिनेत्याने लिहिले होते.अर्जुन शेवटचा 'सिंघम अगेन' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. दुसरीकडे, सलमान खान पुढील वर्षी 'सिकंदर' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदमध्ये प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT