Arjun Kapoor Malaika Arora Dance Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Dance Video : ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर मलायकाचे अर्जुनसोबत ठुमके; पाहा जबदरस्त VIDEO

सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुन कपूरचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Arjun Kapoor Malaika Arora Dance Video : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी चर्चेत असते. मलायका अर्जुन कपूरसोबतचे नेहमीच फोटो व्हिडीओ (Social Media) शेअर करत असते. वयाचं बंधन तोडून प्रेम करणारं हे कपलं नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. सध्या सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुन कपूरचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Dance Video)

या व्हिडीओत दोघेही ‘छैय्या छैय्या’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसून येत आहेत. दोघांनीही केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ (Viral Video) घालतोय. मलायका आणि अर्जुनचे चाहते या डान्सला तुफान प्रतिसाद देताहेत. अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांच्या वेडिंग पार्टीमध्ये अर्जुन मलायकाने आवर्जून हजेरी लावली होती.

यावेळी दोघेही रोमँटिक अंदाजात डान्स करताना दिसत आहे. कुणाल आणि अर्पिता यांनी २८ ऑगस्ट २०२२ रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केले. त्याआधी लग्नापूर्वी कुणालने बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या मित्रमैत्रिणींसाठी प्री-वेडिंग पार्टीचे आयोजन केले होते. (Malaika Arora Dance Video)

या पार्टीमध्ये अर्जुन कपूर, मलायका अरोरा, यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हजर होते. दरम्यान, याच पार्टीतला अर्जुन मलायकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन ‘छैय्या-छैय्या’ गाण्यावर बिंधास्त डान्स करताना दिसत आहेत.

यातील एका व्हिडीओमध्ये अर्जुनने मलायकाच्या माथ्यावर किससुद्धा केलं. या पार्टीसाठी दोघांनी थीमनुसार ‘व्हाईट अँड ब्लॅक’ कपडे परिधान केले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT