Arijit Singh Third Popular Singer On Spotify Saam TV
मनोरंजन बातम्या

Arijit Singh Most Popular Singer: अरिजित सिंग भारतातील सर्वात लोकप्रिय गायक; रिहाना, बिले एलिस इंटरनॅशन गायकांना टाकले मागे

Pooja Dange

Arijit Singh Beats Taylor Swift:

अरिजित सिंगच्या गाण्याने तरुणाई वेड लावले आहे. सध्या त्याच्याच गाण्यांची हवा आहे. बॉलिवूड गायकांच्या यादीत अरिजित सिंगचे नाव देखील समाविष्ट झाले आहे.

अरिजित सिंगच्या चाहत्यांसाठी एका आनंदाची बातमी आहे. Spotify या ऑनलाइन म्युझिक अॅपवर अरिजित सिंग हा भारतातील सर्वात लोकप्रिय गायक बनला आहे. Spotify वर अरिजित सिंग हा सर्वात प्रसिद्ध भारतीय गायक बनला आहे.

ऑनलाइन म्युजिक आणि पॉडकास्ट अॅप Spotify वर सर्वाधिक लोकप्रिय गायकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, त्यात अरिजित सिंगचे नाव सर्वाधिक लोकप्रिय गायकांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. तर जगभरातील गायकांच्या यादीत अरिजित सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जागतिक क्रमवारीत एड शीरन आणि अरिना ग्रांडे अरिजित सिंगच्या पुढे आहेत. अरिजित सिंगने प्रसिद्ध इंग्लिश गायिका टेलर स्विफ्ट, रिहाना, बिली एलिस, अॅडेल, डेरेक, द वीकेंड आणि एमिनेम यांसारख्या अनेक लोकप्रिय गायकांना मागे टाकले असले आहे.

परंतु गायकांच्या लोकप्रियतेची ही यादी गायकांची ग्रोथ, त्यांचे फॉलोवर्स, गेल्या 8 महिन्यांतील गाणी या आधारावर निवडण्यात आली आहे. त्या आधारावर अरिजित सिंग अनेक दिवसांपासून आपल्या गाण्यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (Latest Entertainment News)

अरिजित सिंग नवीन गाणी

गेल्या 1 महिन्यात अरिजित सिंगची अनेक उत्तम गाणी प्रदर्शित झाली आहेत. सध्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील त्याचे 'चलेया' हे गाणे रिलीज झाले आहे, जे लोकांना खूप आवडले आहे.

यापूर्वी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील 'झुमका, वे कावाला या आणि तुम क्या मिले' सारखी अरिजितची गाणीही गाजत आहेत. एवढेच नाही तर वरुण धवनच्या 'बावल' चित्रपटातील 'तुम्हे कितना प्यार करते' हे गाणेही लोकप्रिय झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT