Arbaz Patel- Nikki Tamboli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arbaz Patel- Nikki Tamboli: निक्कीला प्रपोज करणार का? त्या प्रश्नावर अरबाजने स्पष्टचं सांगितलं, म्हणाला 'जर तिला हे नातं...'

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर देखील अरबाज हा चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निक्की हे समीकरण सर्वांनाच ठाऊक आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा शो सध्या चांगलाच गाजताना दिसतो आहे. बिग बॉस च्या घरात स्पर्धकांची रंगतदार खेळी पाहायला मिळत आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरातून पंढरीनाथ कांबळे हा स्पर्धक एलिमेट झाला आहे. सातव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेल बाहेर पडला. कमी मत मिळाल्याने अरबाजला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर देखील अरबाज हा चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निक्की हे समीकरण सर्वांनाच ठाऊक आहे. कधी भांडले तर कधी प्रेम केलं अशीही जोडी आजही चर्चेचा विषय बनली आहे. निक्की आणि अरबाज सतत एकमेकांना वेळ द्यायचे. बिग बॉसच्या घरात या दोघांची जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरबाजने माध्यमांशी संवाद साधला आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजला, कॅमेराच्यासमोर तू निक्कीला प्रपोज करशील का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर अरबाजने ,"जर निक्कीला प्रपोज केले तर ते खूप स्पेशल असेल तसेच जर निक्कीला हे नातं पुढे न्यायचं असेल तर कॅमेरासमोरच प्रपोज करणार" असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात आणखी चार नव्या कारागृहांसाठी जागा आरक्षित

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं; आजीने भाजी विकून मोठं केलं, UPSC क्रॅक करत कॉन्स्टेबल उदय कृष्णा रेड्डी झाले IPS अधिकारी

Todays Horoscope: 'या' राशींसोबत आज मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील; वाचा राशीभविष्य

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT