Bigg Boss Marathi 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: अपूर्वासह किरणने यांचा केला 'Times Up'; उरलेल्या खेळाला मिळणार नवे वळण...

बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांसह प्रेक्षकांना पण मोठा धक्का बसला आहे. कारण गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एक नाहीतर डबल एलिमिनेशन कार्य पूर्ण झाले होते.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांसह प्रेक्षकांना ही खुप मोठा धक्का बसला आहे. कारण गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एक नाहीतर डबल एलिमिनेशन कार्य पूर्ण झाले. ज्यामध्ये शनिवारी विकास सावंतला तर रविवारी अमृता देशमुखला घराबाहेर पडावे लागले होते. आता या आठवड्यात बिग बॉसच्या सदस्यांना कोणतं नवं सरप्राईझ मिळणार? कोण नॉमिनेशनमध्ये जाणार ? हे आता लवकरच कळेलच

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये दिसून येत आहे आज घरात "TIMES UP" हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या कार्यात जो सदस्य आपल्याला घरामध्ये राहण्यास पात्र वाटत नाही त्यांच्या नावाच्या घड्याळावर हातोडा मारायचा आहे. यावेळी अपूर्वा आरोह वेलणकरच नाव नॉमिनेशन साठी घेते आणि म्हणते, 'त्याला जर एवढं कळलं असतं तर कदाचित त्याच्या सिझन मध्येच तो जिंकला असता... गो बॅक सायमन..' म्हणत ती हातोडा मारते.

यावेळी किरण माने प्रसाद जवादेला नॉमिनेट करतो. किरण म्हणतो, 'बिग बॉस मधला ९० टक्के वेळ सोफ्यावर शांतपणे बसून वाया घालवला आहेस.. त्यामुळे तू आता बाहेर जायला हवं.. असं मला वाटतं..' त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार ? ही आजच्या भागात कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : वजन राहील कंट्रोलमध्ये अन् चेहराही करेल ग्लो, रोज नाश्त्यासोबत प्या 'ही' २ मिनिटांत बनणारी स्मूदी

Women Schemes In Maharashtra: महिलांसाठी आर्थिक वरदान ठरणार! 'या' ५ सरकारी योजना लाडकीला जबरदस्त लाभ मिळवून देणार, अर्ज कसा करायचा?

पुण्यात अनैतिक संबंधामुळे घडला रक्तरंजित थरार; मुलाने आईच्या बॉयफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून आणखी एकाला ताब्यात घेतलं

Navi Mumbai: नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT