Apurva Nemlekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Apurva Nemlekar: 'मी रेखाजींसारखी दिसतेय', अपूर्वाचा स्पेशल लूक; Photo पाहा

Apurva Nemlekar Special Look: 'गणेशोत्सव २०२४' कार्यक्रमानिमित्त अपूर्वा नेमळेकरने खास लूक केला आहे जो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या चर्चेत आहे. अपूर्वा मालिका अन् नाटकांमधून प्रसिद्धीझोतात आली. अपूर्वा 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून घराघरात पोहोचली. मालिकेतील अपूर्वाची शेवंता या भूमिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसत आहे.

नुकतंच अपूर्वाने 'स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024' या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानिमित्त अपूर्वाने केशरी रंगाची काठाची साडी नेसली आहे. केसांत गजरा, डोक्यावर बिंदी, गळ्यात डायमंडचा मोठा हार असा लूक केला आहे जो उठून दिसतोय.

दरम्यान नुकत्याच सकाळला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वाने आपण रेखाजीसारखं दिसूयात अशी संकल्पना होती. आणि ती मी पूर्ण केला आहे. गणेशोत्सवानिमित्त पारंपारिक लूक करण्याची संधी मला मिळाली आहे. असं अपूर्वाने सांगितलं आहे. अपूर्वाच्या कामाबद्दल बोलायचं तर, अपूर्वा सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत अपूर्वा खलनायिकेच्या भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT