Apurva Makhija Saam Tv
मनोरंजन बातम्या

Apurva Makhija: आईला बलात्काराच्या धमक्या, सोशल मीडियाही बंद; 'इंडियाज गॉट लॅटेंट' वादामुळे अपूर्वा मखीजाच्या अडचणीत वाढ

Apurva Makhija Controversy: 'इंडियाज गॉट लैटेंट' या यूट्यूब शोमधील अश्लील वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा अडचणीत सापडली आहे.

Shruti Vilas Kadam

Apurva Makhija Controversy: 'इंडियाज गॉट लैटेंट' या यूट्यूब शोमधील अश्लील वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा अडचणीत सापडली आहे. या प्रकरणात तिच्यावर विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले असून, तिला आणि तिच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावरून बलात्काराच्या आणि मृत्यूच्या धमक्या मिळत असल्याचे अपूर्वाने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले.

या वादानंतर अपूर्वा मखीजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सर्वांना अनफॉलो केले असून, सध्या ती कोणालाही फॉलो करत नाहीत. तिचे 2.9 मिलियन फॉलोअर्स आहेत, परंतु तिने कोणत्याही नवीन पोस्ट्स शेअर केलेल्या नाहीत. 'इंडियाज गॉट लैटेंट' च्या प्रकरणामुळे तिला ऑनलाइन व्यवसाय करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

या वादात अपूर्वा मखीजा, रणवीर इलाहाबादिया आणि शोचे निर्मात्यांनी राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहून त्यांच्या वक्तव्यांबद्दल खेद व्यक्त केला आहे. त्यांनी लेखी माफीनामा सादर केला असून, भविष्यात महिलांविषयी आदराने बोलण्याचे आश्वासन दिले आहे.

या प्रकरणामुळे अपूर्वा मखीजाला राजस्थान पर्यटन विभागाच्या 'ट्रेजर हंट' शूटमधून वगळण्यात आले आहे. या शूटमध्ये तिला अभिनेता अली फजलसोबत सहभागी व्हायचे होते, परंतु वादामुळे तिचे नाव यादीतून काढण्यात आले. या सर्व घडामोडींनंतर अपूर्वा मखीजाने 'भिंतींनाही कान असतात' असा मॅसेग इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

SCROLL FOR NEXT