Aparna Balamurali  Saam Tv
मनोरंजन बातम्या

National Film Awards 2022 : राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, भारावलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या एका गोष्टीला घाबरली

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ ची काल, शुक्रवारी घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यापासून ते गायकापर्यंत पुरस्कार देण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ (National Film Awards 2022) ची काल, शुक्रवारी घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यापासून ते गायकापर्यंत पुरस्कार देण्यात आले आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित 'सूरराई पोत्रू' या तमिळ चित्रपटातील अभिनेत्री अपर्णा बालमुरली(Aparna Balamurali) हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यावेळी अभिनेत्री अपर्णा पोल्लाचीमध्ये शूटिंग करत होती. पुरस्कार जाहीर झाल्यानं अपर्णा भारावली होती, पण तिची पहिली प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेला मीडियाचा मोठा ताफा बघून अपर्णा प्रचंड घाबरली होती.

अपर्णा म्हणाली, 'तुमचे इथे येणे व्यर्थ जाणार नाही ना, याची मला काळजी वाटत होती. पण आता मला भीती वाटत नाही. मी या एवढ्या मोठ्या पुरस्काराने भारावून गेले आहे. मी या पुरस्काराचे श्रेय चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुधा कोंगारा यांना देते. ज्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या आणि मला या चित्रपटात उत्तम प्रकारे काम करण्यासाठी प्रत्येक क्षणी साथ दिली'.

अपर्णा पुढे म्हणाली, 'कोविड काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे आम्हाला अपेक्षित होतं तसं हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. पण आता मला याचं वाईट वाटत नाही. मी खरोखर खूप एक्साइट झाले आहे. मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत'.

२६ वर्षीय अपर्णा ही मूळची त्रिशूरची आहे. तिने वयाच्या १८ व्या वर्षी 'यात्रा थुडारुन्नू' या मल्याळी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. २०१५ मध्ये, 'ओरू सेकंड क्लास यात्रा' हा चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु २०१६ मध्ये आलेल्या 'महेशिंते प्रतिकारम' चित्रपटामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने "ओरू मुथास्सी गडा" या कॉमेडी चित्रपटातही काम केले. याशिवाय तिने संगीत क्षेत्रातही करीअर केले. अपर्णाने 'मौनंगल मिंदुमोरी', 'थेनल निलाविंटे', 'थंथेन' अशी प्रसिद्ध गाणी गायली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT