Anushka Sharma Sales Tax Instagram @anushkasharma
मनोरंजन बातम्या

Anushka Sharma Case: 'टॅक्स भरणे तिची जबाबदारी', अनुष्काच्या याचिकेवर सेल्स टॅक्स विभागाचे उत्तर

Copyright On Anushka's Video: सेल्स टॅक्स विभागाने 2012 आणि 2016 मध्ये अभिनेत्रीवर कारवाई केली होती.

Pooja Dange

Anushka Sharma Is Liable To Pay Sales Tax: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आता नव्या अडचणीत सापडली आहे. यावेळी अडचण ही तिच्या मुलीमुळे किंवा चित्रपटामुळे झालेली नाही. सेल्स टॅक्स विभागाने अनुष्कावर नुकतीच कारवाई केली आहे.

सेल्स टॅक्स विभागाने 2012 आणि 2016 मध्ये अभिनेत्रीवर कारवाई केली होती. तिला टॅक्स जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीसला अनुष्कानेच आव्हान दिले होते. आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे.

अनुष्का शर्माने तिच्या भूतकाळातील सर्व स्टेज परफॉर्मन्स आणि पुरस्कार सोहळ्यात तिच्या उपस्थितीवर कॉपीराइट घेतला आहे. यानंतर जर कोणी तिच्या परफॉरन्सचा किंवा सोहळ्यातील व्हिडिओ वापरले त्यांना अनुष्काला पैसे द्यावे लागतील. या पैशांवर अनुष्काला टॅक्स भरावा लागेल. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अनुष्का शर्माच्या या आता सेल्स टॅक्स वेगाने उत्तर दिले आहे.

अनुष्का शर्माच्या सेल्स टॅक्स विभागाच्या आदेशाविरुद्धच्या वादाला उत्तर देताना, विभागाने आता मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केले आहे की अभिनेत्री 5% सेल्स टॅक्स भरण्यास जबाबदार आहे. कारण ती कॉपीराइटची पहिली मालक आहे. अवॉर्ड फंक्शन्स किंवा स्टेज शोमध्ये तिची कलात्मक कामगिरीचे कॉपीराइट तिने कार्यक्रमांच्या निर्मात्यांना हस्तांतरित केले आहेत.

विभागाने सांगितले की, “याचिकाकर्ता तिच्या सेवा पुरवत आहे आणि सेवांच्या कराराद्वारे उत्पन्न मिळवत आहे (म्हणजे तिला कोणीही कामावर ठेवले नाही). म्हणून, कॉपीराइट कायद्यांतर्गत, ती तिच्या कलात्मक कामगिरीमध्ये तयार केलेल्या कंटेन्ट कॉपीराइटची पहिली मालक आहे.”

सेल्स टॅक्स विभागाने पुढे म्हटले आहे की, “तिचे कॉपीराइट व्यावसायिक कारणांसाठी क्लायंट कंपनीकडे हस्तांतरित केले जातात आणि पैशांच्या बाबतीत तिचा देखील विचारात केला जाते. म्हणून, MVAT कायद्यांतर्गत सेल्सच्या व्याख्येखाली ते समाविष्ट आहे.” अनुष्का शर्मा इच्छित असल्यास, ती रिव्हिजन अपील करू शकते परंतु लेखी याचिका घेऊन थेट उच्च न्यायालयात जाऊ शकत नाही, असेही त्यात म्हटले आहे.

डिसेंबर 2022 मध्ये अनुष्काने तिच्या टॅक्स सल्लागाराच्या मदतीने टॅक्सविषयक याचिका दाखल केल्या होत्या. त्यानंतर न्यायाधीशांनी अनुष्काला फटकारले आणि सांगितले की, ती स्वतः याचिका का दाखल करत नाही. यानंतर अभिनेत्रीने जुन्या याचिका मागे घेत स्वत: नवीन याचिका दाखल केली होती.

अनुष्काला 2 कोटी 80 लाख भरण्याची नोटीस सेल्स टॅक्स विभागाने बजावली होती. दाद मागण्यासाठी आता लवादाकडे अनुष्काला 28 लाख रुपये भरावे लागणार आहेत. सेल्स टॅक्स विभागाचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT