Rupali Ganguly SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rupali Ganguly : अनुपमा फेम रुपाली गांगुलीने सावत्र लेकीच्या आरोपांना दिलं उत्तर; अब्रुनुकसानीची नोटीस अन् ५० कोटींची मागितली भरपाई

Rupali Ganguly-Esha Varma : रुपाली गांगुलीने तिच्या सावत्र मुलीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच 50 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यामागचे नेमकं कारण काय जाणून घ्या.

Shreya Maskar

अनुपमा (Anupamaa) फेम अभिनेत्री रूपाली गांगुली (Rupali Ganguly) आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. रूपाली गांगुलीची सावत्र मुलगी ईशा वर्माने (Esha Varma ) तिच्यावर अनेक आरोप केले आहेत. आता त्यावर अभिनेत्री रूपाली गांगुलीने सडेतोड उत्तर दिले आहे.

रूपालीने तिच्या सावत्र मुलीला तिचे वैयक्तिक जीवन बदनाम केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच अब्रुनुकसानी केल्यामुळे ५० कोटींची भरपाईही देखील मागितली आहे. रूपालीच्या वतीने ही कायदेशीर नोटीस वकील सना रईस खानने पाठवली आहे. ती बिग बॉस 16 मध्येही सहभागी होती.

ईशा वर्माने रूपाली गांगुलीवर तिच्या वडीलांसोबत म्हणजे अश्विन के वर्मासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा आरोप केला. मीडिया रिपोर्टनुसार, रूपाली गांगुलीची वकील सना रईस खान म्हणाली, "आम्ही रूपालीच्या सावत्र मुलीला खोट्या आणि हानिकारक विधानांना प्रतिसाद म्हणून मानहानीची नोटीस पाठवली आहे. कारण हे प्रसिद्धीसाठी बदनामीचे डावपेच आहेत. ज्याच्या विरोधात रूपाली आहे. तिने आपल्या सुरक्षिततेसाठी हे कायदेशीर पाऊल उचलले आहे.रूपालीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे हाच त्यामागील मुख्य उद्देश आहे. यामुळे रूपाली गांगुली यांना भावनिक त्रासासोबतच वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिमाही खराब होत आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

Maharashtra Live News Update: मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

SCROLL FOR NEXT