Anupama Update Instagram @anupa_maa2k23
मनोरंजन बातम्या

Anupama 27 June Episode Update : अनुपमासाठी 'बा'च्या डोळ्यात पहिल्यांदाच दिसले प्रेम ; माया रचतेय नवीन डाव

Anupama Latest Update : अमेरिकेला जाण्यापूर्वी निर्माते अनुपमाच्या आयुष्यात रोज एक नवीन वादळ आणत आहेत.

Pooja Dange

Shah Family surprises Anupama : रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना स्टारर 'अनुपमा' या मालिकेचे सध्या खूप ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत. एकीकडे प्रेक्षक अनुपमा अमेरिकेला जाण्याची वाट पाहत आहेत. दुसरीकडे, अमेरिकेला जाण्यापूर्वी निर्माते अनुपमाच्या आयुष्यात रोज एक नवीन वादळ आणत आहेत.

रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना स्टारर 'अनुपमा'मध्येही अनुज अनुपमाच्या फेअरवेल पार्टीची तयारी करत असल्याचे दिसले. अनुपमासाठी अनुजची तयारी पाहून माया संतापते आणि तिचा राग जेवण बनवताना पिठावर काढते. रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा'मधील ट्विस्ट्स आणि टर्न्स इथेच संपत नाहीत. (Latest Entertainment News)

रुपाली गांगुली स्टारर 'अनुपमा' या मालिकेत अनुपमा शाह हाऊसमध्ये छान तयार होऊन गेली असल्याचे पाहायला मिळणार आहे. आज सर्व काही चांगले व्हावे अशी ती देवाकडे प्रार्थना करते. शाह हाऊसचे गेट उघडताच सर्वजण तिचे औक्षण करण्यासाठी जमल्याचे दिसणार आहे.

बा आणि घरातील इतर मंडळी तिची आरती करतात. यानंतर अनुपमा स्वतः मंदिरात जाऊन दिवा लावतात. मात्र, या सगळ्या दरम्यान बा ला तिच्या कृत्याची लाज वाटते आणि म्हणते की आजपर्यंत मी फक्त अनुपमाचे वाईट केले आहे.

गौरव खन्ना स्टारर 'अनुपमा' या मालिकेत अनुपमासाठी कपाडिया घरातही तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळणार आहे. अनुपमाला सहा वाजता तिथे जायचे आहे. तर अनुज खूप अस्वस्थ झाला आहे.

अनुज अंकुशला सांगत आहे की 6 आज लवकर का वाजत नाहीत. अनुज अंकुशला सांगतो की अनुपमा माझे जीवन आहे आणि ती गेली तर मी कसे जगेन. मात्र, अंकुश त्याला सांगतो की, त्याचे मन सांगत आहे की अनुपमा जाणार नाही. पण अनुज त्याला शांत करतो आणि म्हणतो, "मला माझ्या अनुच्या वाटेत यायचं नाही."

'अनुपमा'मधला मनोरंजनाचा डोस इथेच संपत नाही. अनुजच्या वाढत्या अस्वस्थतेमुळे मायाची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. फेअरवेल पार्टीतही ती अनुपमाला त्रास देण्याचा विचार करेल. माया गिफ्ट पॅक उचलते आणि म्हणते की 'काहीतरी केले पाहिजे जेणेकरून हा त्रास कायमचा दूर होईल.' (Serial)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

SCROLL FOR NEXT