Anupam Kher Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anupam Kher: वय मॅटर करत नाय! या व्यक्तीनं चालवली सर्वात छोटी सायकल, अनुपम खेर यांनी पोस्ट केला व्हिडीओ

Anupam Kher Shared Video: नुकतंच अनुपम खैर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावर अनुपम खेर हे चाहत्यांशी कनेक्ट असतात. विविध ठिकाणी भेट दिल्यानंतर तेथील आठवणी, क्षण हे त्यांच्य चाहत्यासोबत व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून शेअर करतात. नुकतंच अनुपम खैर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

अनुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती छोटी सायकल चालवताना दिसत आहे. लहान मुलांच्या सायकलपेक्षाही ही सायकल छोटी आहे. त्यांनी अत्यंत आनंदाने सायकल चालवली आहे. सोशल मीडियावर अनुपम यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी वय आणि उंची नाही तर तुम्ही स्वत:ला किती फिट ठेवता हे सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही व्यक्ती वृद्ध दिसते अश्या वयात एवढी छोटी सायकल चालवणे म्हणजे खरचं प्रेरणा आहे असं म्हणायला हरकत नाही.

अनुपम खेर हे कायमच प्रेक्षकांना प्रेरणा देणारे व्हिडीओ शेअर करत असतात. कधी रस्त्यावरील गरीब लोक तर कधी ऐतिहासिक क्षणाचे व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनुपम यांनी शेअर केलेला हा सायकलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आले आहेत. तर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी अनुपमाच्या यांच्या व्हिडीओवर ग्रेट, प्रेरणा कायम अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने काय टॅलेंट आहे असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT