Emergency Saam Tv
मनोरंजन बातम्या

Emergency : कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी'त एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीची एन्ट्री

कंगना रनौतच्या बहुप्रतीक्षित 'इमर्जन्सी' या चित्रपटात आणखी एका दिग्गज अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना रनौतच्या बहुप्रतीक्षित 'इमर्जन्सी'(Emergency) या चित्रपटात आणखी एका दिग्गज अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कंगनाने(Kangana Ranaut) चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करून याची माहिती दिली आहे.

कंगनाने पोस्टर शेअर करत सांगितले की, अभिनेत्री महिमा चौधरी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती पुपुल जयकरची भूमिका साकारणार आहे. पुपुल या इंदिरा गांधींच्या अगदी जवळच्या आणि विश्वासू मैत्रीण होत्या. वयाच्या १५व्या वर्षापासून इंदिराजी आणि त्यांच्यात मैत्री होती. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्या त्यांच्या सांस्कृतिक सल्लागार बनल्या.

चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कंगना रनौतने लिहिले, 'पुपुल जयकरची भूमिका साकारणाऱ्या महिमा चौधरीची ओळख करून देत आहे. ज्यांनी आयर्न लेडी म्हणजेच इंदिरा गांधींच्या आयुष्यातील चढ-उतार, वैयक्तिक गोष्टी आपल्या लेखणीतून जगासमोर ठेवल्या. पुपुल जयकर या जवळची मैत्रीण, लेखिका आणि विश्वासू व्यक्ती होत्या. #इमर्जन्सी.'

त्याचवेळी महिमा चौधरीने या चित्रपटात सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना महिमा चौधरीने लिहिले की, 'पुपुल जयकरची भूमिका साकारायला मिळाल्याने मी उत्साही आहे. कंगना रनौत तू खरोखर खूप प्रतिभावान, नीडर, धाडसी आहेस. 'इमर्जन्सी' या चित्रपटात मला तुझ्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे.'

महिमा चौधरी पुढे म्हणाली, 'कंगना तुझ्यासोबत काम करणे हा खूप उत्तम अनुभव आहे. तू प्रत्येक भूमिका किती सहजतेने साकारतेस; एक अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता! मला पुपुल म्हणून कास्ट केल्याबद्दल धन्यवाद.' याआधी कंगना रनौतने श्रेयस तळपदेची या चित्रपटातील एन्ट्रीची घोषणा केली होती. या चित्रपटातील श्रेयस तळपदेचा पोस्टर शेअर केला होता.

'इमर्जन्सी' या चित्रपटात श्रेयस तळपदे अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात एन्ट्री झाल्याबद्दल श्रेयसने कंगना आणि निर्मात्यांचे आभार मानले होते. या चित्रपटात अनुपम खेर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात अनुपम खेर लोकनायक जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT