Ankita Walawalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: अंकितासाठी होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट; म्हणाला, आयुष्यातला सगळ्यात मोठा...

Ankita Walawalkar: बिग बॉसचा यंदाचा सीझन संपल्यानंतर अंकिताच्या लग्नाची एकच चर्चा रंगली आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन चांगलाच गाजला. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तब्बल ७० दिवसांच्या या शोमध्ये स्पर्धकांनी प्रोफेशनल टु पर्सनल सर्वच खुलासे केले. कोकण हार्टेड गर्ल अंकिताने देखील तिच्या भविष्याबद्दल भाष्य केले होते. ज्याची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे.

बिग बॉसचा यंदाचा सीझन संपल्यानंतर अंकिताच्या लग्नाची एकच चर्चा रंगली आहे. अंकिताचा ब्रॉयफ्रेड कोण? अंकिता कोणाशी बांधणार लग्नगाठ? अश्या अनेक प्रश्नाचे उत्तर मिळाले. काल नुकतेच अंकिताने होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर केला. कुणाल भगत अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. कुणाल हा संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यानी काम केले आहे.

कुणालची अंकितासाठी खास पोस्ट

कुणालने अंकितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अंकिता आणि कुणाल लवकरच लग्न करणार आहेत. पोस्टमध्ये कुणालने, "तु आयुष्यात आलीस आणि खरं प्रेम ह्या शब्दाचा अर्थ कळला...आपल्या आयुष्यातला सगळयात मोठा निर्णय...आपण लग्न करतोय... खूप खूप प्रेम,

तुला खुश ठेवणं,तुला हसवणं,आता माझी सवय झाली आहे..आणि ही माझी सवय नेहमी आशीच ठेवेन …विश्वासाचं नातं असं लिहलं आहे. दसऱ्यानिमित्त अंकिताने फोटो शेअर करत होणाऱ्या नवऱ्याची माहिती दिली आहे. दोघांनीही त्यांच्या प्रेमाच्या नात्याचा उल्लेख करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT