Ankita Walawalkar wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: 'तू जशी आहेस तशी फार सुंदर...'; कोकण हार्टेड गर्लची मेहंदी सोहळ्यातील भावनिक पोस्ट व्हायरल

Ankita Walawalkar wedding: अंकिता प्रभूवालावलकरच्या घरी लगीनघाई सुरू असून अंकिता आणि कुणालच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Ankita Walawalkar wedding : 'बिग बॉस मराठी' फेम सोशल मिडीया इन्फ्ल्युएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख तिच्या चाहत्यांना करुन दिली. त्यानंतर जानेवारी महिन्यात लग्नपत्रिकेची झलक शेअर करत केली. आता अंकिता लवकरच लग्न बंधनात अडकणार असून लग्न सोहळ्याला तिच्या गावच्या घरी सुरुवात झाली आहे.

काल अंकिताचा मेहंदी सोहळा पार पडला यानिमित्ताने तीने सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करत तिच्या होणाऱ्या नवरा कुणाल भगतसाठी भावनिक कॅप्शन लिहीले. अंकिती लिहीते,' तू अशी आहेस ,तू तशी आहेस ,तू काही करू शकत नाहीस आयुष्यात असं बोलणाऱ्या गर्दी मधे जेव्हा कोणी हे बोलतं “ तू जशी आहेस तशी फार सुंदर आहेस,तू प्रेमळ आहेस,आणि माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे.तू जशी आहेस तशीच कायम रहा कारण मी तुझ्या असण्यावर प्रेम करतो” तेव्हा वाटलं आयुष्याला खरा अर्थ आहे. त्याच आयुष्याची पहिली पायरी सोबत चढतोय.'

अंकिताचे हे कॅप्शन वाचून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेक चाहते कमेंट करून तिच्या पुढील आयुष्यासाठी तिला शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्याने लिहिले, अंकीता आणि कुणाल, तुमच्या नव्या प्रवासासाठी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.

एकाने लिहिले असेच नेहमी एकमेकांसोबत राहा तर अनेकांनी हार्ट ईमोजी पोस्ट केले आहेत. अंकिता येत्या दोन दिवसात लग्न बंधनात अडकणार असून तिच्या घरी लग्नानिमित्ताने कोकणी पद्धतीने जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT