Ankita Lokhande And Madhuri Dixit Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande Trolled : ‘स्वत:ला माधुरी दीक्षित नको समजू...’, धकधक गर्लच्या लूकमध्ये आली अंकिता लोखंडे, नेटकऱ्यांनी सुनावलं

Ankita Lokhande And Madhuri Dixit Look : ‘डान्स दिवाने’ मध्ये माधुरी दीक्षितच्या बर्थडे विक सेलिब्रेट केला जात आहे. यावेळी अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘हमको आज कल है इंतजार’ गाण्याप्रमाणे लूक केला होता. यावेळी धकधक गर्लसोबत अंकिताने तुलना केल्यामुळे तिला ट्रोल केलं आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा येत्या १५ मे ला वाढदिवस आहे. सध्या माधुरी ‘डान्स दिवाने’ची परिक्षक म्हणून काम पाहत आहे. या आठवड्यामध्ये अभिनेत्रीचा बर्थडे स्पेशल विक सेलिब्रेट केलं जाणार आहे. सध्या सर्वच स्पर्धक या बर्थडे स्पेशल विकची जोरदार चर्चा करीत आहे.

अशातच बिग बॉस फेम अंकिता लोखंडेनेही माधुरी दीक्षितप्रमाणे ‘हमको आज कल है इंतजार’ या गाण्यामधील लूक केलेला आहे. अभिनेत्रीने थेट धकधक गर्लसोबत आपली तुलना केल्यामुळे तिला ट्रोल केलं आहे. (Bollywood Actress)

माधुरी दीक्षितच्या बर्थडे स्पेशल विकमधील अंकिता लोखंडेच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. यावेळी अभिनेत्रीने येल्लो क्रॉप टॉप, ग्रीन कलर, रेड बॉर्डर असलेली धोती, लूकला साजेसे दागिने आणि मेकअप असा लूक अंकिताने अगदी माधुरी प्रमाणेच केलेला आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. (Ankita Lokhande)

अंकिता लोखंडेचा हा लूक ‘विरल भयानी’ने त्यांच्या इन्स्टा पेजवर शेअर केलेला आहे. या व्हायरल लूकवर नेटकऱ्यांनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. ‘खूपच सुंदर दिसते..’, ‘माधुरीप्रमाणे सुंदर तू दिसत नाही’, ‘फक्त माधुरी दीक्षितच...’, ‘स्वत:ला तू माधुरी दीक्षित नको समजूस’ अशा शब्दात तिला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केले आहे. (Social media)

अंकिता लोखंडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती शेवटची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटामध्ये दिसली होती. तिने चित्रपटामध्ये, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नीचे पात्र साकारले आहे. त्यासोबतच ती ‘बिग बॉस १७’मध्येही दिसली होती. पण थोडक्यात तिचे बिग बॉसचे विजेतेपद हातातून निसटले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT