Anil Kapoor-Anupam Kher Emotional Video: Saam TV
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor At Satish Kaushik's birth anniversary: मित्राच्या आठवणीत अनिल कपूरला अश्रू अनावर; ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल

Anil Kapoor Viral Video: अभिनेता स्टेजजवळ जातानाच भावूक होऊन रडायला लागतात.

Pooja Dange

Anil Kapoor-Anupam Kher Emotional Video: दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्या जयंतीनिमित्त कार्यकारणीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील त्याच्या मुलीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. वंशिकाचा व्हिडिओ नेटकरी भावुक झाले होते. आता सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर आणि अनिल कपूर ढसाढसा रडताना दिसत आहेत.

अनेक इन्स्टाग्राम पेजवर अनिल कपूर आणि अनुपम खेर यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर त्यांच्या मैत्रीविषयी बोलताना दिसत आहेत.

दरम्यान अनुपम खेर, अनिल कपूरला स्टेजवर देखील बोलावतात. पण अभिनेता स्टेजजवळ जातानाच भावूक होऊन रडायला लागतात आणि मंचावर येण्यासाठी अनुपम यांना नकार देतात. हे पाहून अनुपम खेर देखील भावूक होतात.

व्हिडीओमध्ये अनुपम खेर "ये अनिल. हिरो नेहमी रडतात आणि मित्र रडतात. ये" असे म्हणताना ऐकू येते, त्यानंतर अनिल कपूर मंचाजवळ जाताना मध्येच थांबतात. त्याच्या डोळ्यात पाण्याचा धारा असतात. अनुपमला नकार देत अनिल जागेवर जाऊन बसतात. यावर अनुपम म्हणतात, "अनिल तू वेडा आहेस. मी चांगले करत होतो." असे बोलून अनुपम देखील रडू लागतात.

अभिनेते सतीश कौशिक यांच्या गौरवशाली जीवनाचे स्मरण करण्यासाठी, त्यांच्या जयंतीनिमित्त कथांसह, संगीतसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतसंध्येला सतीश कौशिक यांची मित्र आणि इंडस्ट्रीतील कलाकार उपस्थित होते.

त्याचवेळी दिवंगत अभिनेत्याच्या मुलीने वडिलांसाठी लिहिलेले पत्रही वाचून दाखवले. त्याचा व्हिडीओ अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT