Rajkumar Santoshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajkumar Santoshi: 'अंदाज अपना अपना'चे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण?

Rajkumar Santoshi News: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. राजकुमार संतोषी यांना जामनगर न्यायालयाने दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rajkumar Santoshi News:

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. राजकुमार संतोषी यांना जामनगर न्यायालयाने दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांनी जामनगर येथील अशोक लाल नावाच्या व्यावसायिकाकडून एक कोटी रुपये उसने घेतल्याचे वृत्त आहे. पैसे परत करू न करू शकल्याने व्यावसायिकाने जामनगर न्यायालयात त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. यातच न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना घायाळ, घातक आणि अंदाज अपना अपना यांसारख्या चित्रपटांसाठी लोक ओळखतात. दरम्यान, राजकुमार संतोषी यांना जामनगर न्यायालयाने एका जुन्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण 1 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्सचे आहे. जामनगर न्यायालयाने संतोषी यांना 2 वर्षांच्या कारावासासह चेकची दुप्पट रक्कम म्हणजेच 2 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार संतोषी यांनी जामनगरचे व्यापारी अशोक लाल यांच्याकडून एक कोटी रुपये कर्ज घेतले होते. मात्र ही रक्कम ते वेळेवर परत करू शकले नाही. त्यांचे पैसे परत न मिळाल्याने अशोक लाल यांनी जामनगर न्यायालयात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. अशोक लाल यांच्या वकिलांनी सांगितले की, एकेकाळी दोघांमध्ये चांगली मैत्री होती. 2015 मध्ये दिग्दर्शकाने अशोक लाल यांच्याकडून एक कोटी रुपये उसने घेतले होते. राजकुमार संतोषी यांनी अशोक लाल यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांचे 10 चेक देखील दिले होते. मात्र ते सर्व चेक 2016 मध्ये बाऊन्स झाले.

अशोक लाल यांच्या वकिलांनी सांगितले पुढे सांगितले की, न्यायालयाने या प्रकरणी राजकुमार संतोषी यांना समन्स बजावले होते आणि प्रत्येक बाऊन्स झालेल्या चेकसाठी 15,000-15,000 रुपयांचा दंडही ठोठावला होता. मात्र त्यांनी समन्स घेतले नाही. राजकुमार संतोषी न्यायालयातही हजर झाले नसल्याचे बोलले जात आहे. अखेर आज म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी जामनगर न्यायालयाने राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना 2 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT