Ananya Pandey SaamTv
मनोरंजन बातम्या

Ananya Pandey : आर्यन खानच्या नात्यावर अनन्या पांडेचा मोठा खुलासा; म्हणाली..

कॉफी विथ करणच्या चौथ्या भागात साउथचा सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे सहभागी झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॅालिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण ७'(Koffee With Karan 7) हा चॅट शो सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे. कॉफी विथ करणच्या चौथ्या भागात साउथचा सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) सहभागी झाले होते. 'कॉफी विथ करण' या शोमध्ये अनन्या आणि विजयने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बिनधास्त गप्पा मारल्या. दरम्यान, दोघानींही अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. ज्याने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

करण जोहरच्या 'कॅाफी विथ करण ७' या चॅट शोमध्ये अनन्याने तिचे अनेक गुपित उघडकीस केले आहे. अनन्याने आदित्य रॉय कपूरसोबतच्या तिच्या नात्याबदद्ल त्याचबरोबर इशान खट्टरसोबतच्या ब्रेकअपर्यंतचे अनेक खुलासे केले आहेत. करण जोहरने अनन्याला सुहाना खान आणि शनाया कपूरसोबतच्या तिच्या बाँडिंगबद्दलही विचारले. त्याचबरोबर अनन्याचा डेब्यू सिनेमा 'स्टुडंट आॅफ द इयर' मधील आठवणींना उजाळा देत सुहानाचा मोठा भाऊ आर्यन खान (Aryan Khan) क्रश होता का? असे करणने विचारले, यावर अनन्याने जे उत्तर दिले त्यावर सगळे थक्क झाले. अनन्याने सांगितले की, होय! आर्यन माझा क्रश होता. पुढे करणने अनन्याला, जर आर्यन तुझा क्रश होता तर तुम्ही दोघे रिलेशनशीपमध्ये का नाही ? असे विचारले त्यावर अनन्याने, 'त्याला विचारा' असे उत्तर दिले.

दरम्यान, गप्पा मारत असताना अनेकदा अनन्याने तिचा विजय देवरकोंडा देखील क्रश असल्याचाही कबुली दिली. यावर करणने विजयला अनन्या आवडते का? असे विचारले असता अनन्याने बोलली, 'मला विजय आवडतो', पण माझ्याकडे विजय कधीच लक्ष देत नाही. मला असे वाटते बरेच लोक विजयचे फॅन आहेत, मी देखील विजयवर भारावून गेले आहे.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अनन्या साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लायगर' मध्ये दिसणार आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित 'लायगर' हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Batatyache Kaap: कुरकुरीत अन् चटपटीत बटाट्याचे काप, जेवणासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन

Maharashtra Cabinet Meeting Controversy: शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्रिमंडळात खडाजंगी|VIDEO

Gondhal Movie: 'आमचा ट्रेलर बघू नका...'; 'गोंधळ' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दिग्दर्शकाचं विचित्र आवाहन, कारण सांगत म्हणाला...

Maharashtra Politics: साताऱ्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश

Maharashtra Live News Update: पावसामुळे जलक्रीडा बंद असल्याने राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT