Aditya Roy Kapur And Ananya Pandey Relationship Instagram
मनोरंजन बातम्या

Aditya- Ananya Relationship: अनन्या- आदित्य रिलेशनमध्ये?; अनन्याच्या आईने होत असलेल्या चर्चेवर सोडले मौन

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र दिसत आहे. त्यांच्या रिलेशनच्या चर्चेवर नुकतीच अनन्याच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Aditya Ananya Relationship: बॉलिवूड मध्ये सध्या असे अनेक सेलिब्रिटी कपल आहे, ज्यांचे सुत जुळले आहे तर काहींचे सुत जुळत असल्याची चर्चा आहे. नुकतेच गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ- कियाराचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले.

आता पुन्हा एका जोडीची त्यांच्या रिलेशनची जोमाने चर्चा सुरू झाली आहे. ती जोडी म्हणजे, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर. या जोडीला अनेकदा एकत्र कॅमेऱ्यात कैद केले. नुकतेच आदित्य रॉय कपूरच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या प्रीमियरला अनन्याने हजेरी लावली होती.

तेव्हापासून सर्वांच्याच नजरा खिळल्या आहे. सोबतच दोघांनीही एकत्र लॅक्मे फॅशन विकमध्ये रॅम्पवॉक केल्याने या दोघांच्याही रिलेशनची पुन्हा चर्चा होताना दिसत आहेत.

हे जोडी गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अनन्याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या दोघांचेही फोटो टाकल्यापासून यांच्या नात्याची चर्चा आहे. ही जोडी खरच रिलेशनमध्ये आहे का ? हे खरंच एकमेकांना डेट करत आहे का ? यावर खुद्द अनन्याची आई भावना पांडेने भाष्य केले आहे. आपल्या लेकीच्या अफेअरबद्दल सतत होत असलेल्या तिने चर्चेवर नुकतंच भाष्य केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत भावना पांडे म्हणाली, “अनन्या अजूनही सिंगलच आहे. खरं तर सिनेसृष्टीत या अशा रिलेशनच्या चर्चा अनेकदा होतच असतात, एका अभिनेत्रीच्या आयुष्यातली ही खूप किरकोळ गोष्ट आहे. याउलट त्यांना प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम पाहता या सगळ्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतो. कारण सकारात्मक विचार नेहमीच नकारात्मक विचारांवर भारी पडतात.”

त्यानंतर भावना पांडेने आपल्या लेकीला मुलाखतीत कायमच आपले पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला दिला. नुकतीच अनन्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासह ‘लाइगर’ या चित्रपटात झळकली. त्यावेळीही तेव्हा सुद्धा अनन्याचं नाव विजयसह जोडलं होतं. आता आदित्य रॉय कपूरबरोबर तिच्या लिंकअपची चर्चा होत आहे. इतकंच नव्हे तर हे दोघे लवकरच साखरपुडादेखील करणार असल्याची चर्चा होत होती, पण अनन्याच्या आईने आपली प्रतिक्रिया देत सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT