Anant- Radhika London In Wedding Party Saam TV
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Wedding Party : लंडनमधील हॉटेलमध्ये साजरा होणार नाही अनंत अंबानी-राधिकाचं पोस्ट वेडिंग; हॉटेल मालकाने केलं स्पष्ट

Anant- Radhika London In Wedding Party : अनंत-राधिकाची ग्रँड वेडिंग पार्टी आता लंडनमध्येही पार पडणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. या वेडिंग पार्टीसाठी दोन महिन्यांसाठी 7 स्टार हॉटेलही बुक करण्यात आलं आहे.

Chetan Bodke

जगातील सर्वात महागडं लग्न म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Mabani Radhika Merchant Wedding) यांचं लग्न. हे लग्न गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईच्या बीकेसीमध्य पार पडलं.

दोन प्री- वेडिंग, संगीत, हळदी आणि लग्न असे हे विधी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहेत. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड, हॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स आणि बिझनेसमन अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी लग्नाला उपस्थित होते.

अनंत-राधिकाची ग्रँड वेडिंग पार्टी आता लंडनमध्येही पार पडणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. या वेडिंग पार्टीसाठी दोन महिन्यांसाठी 7 स्टार हॉटेलही बुक करण्यात आलं आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी या वेडिंग पार्टीकरिता दोन महिन्यांसाठी ७ स्टार हॉटेल बुक करण्यात आलं आहे. म्हणजेच हे हॉटेल अंबानींनी सप्टेंबर महिन्यापर्यंत बुक केले आहे. आता या चर्चांनंतर हॉटेलच्या मालकांचं वक्तव्य समोर आलं आहे. लंडनमध्ये अंबानी यांनी वेडिंग पार्टीकरिता दोन महिन्यांसाठी ७ स्टार हॉटेल बुक केल्याचे वृत्त खोटं आहे, असं त्या हॉटेल मालकाने सांगितले आहे.

लंडनमधील 7 स्टार स्टोक पार्क हॉटेलमध्ये अनंत- राधिकाची वेडिंग पार्टी होणार होती. पण आता हॉटेल मालकाचं वक्तव्य ऐकून सर्वच लोकं बुचकळ्यात पडले आहेत. लंडनमध्ये होणाऱ्या या पार्टीत ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सनही उपस्थित राहणार अशी चर्चा होती. 'द सन'च्या माहितीनुसार, अंबानी कुटुंबीयांनी संपूर्ण हॉटेल दोन महिन्यांसाठी बुक केले होते.

अनंत-राधिकाच्या ग्रँड वेडिंग पार्टीसाठी अंबानींनी स्टोक पार्क इस्टेट भाडेतत्वावर घेतल्याची चर्चा सुरू आहे. लंडनच्या बाहेर, बकिंग हॅमशायर येथे असलेल्या स्टोक पार्क इस्टेटमध्ये हवेली, गोल्फ कोर्स आणि टेनिस कोर्ट यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

SCROLL FOR NEXT