Anant Ambani And Radhika Merchant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant Ambani: अंबानीच्या लेकाच्या साखरपुड्यात चर्चा कपड्याची नाही तर ब्रोचची, किंमत वाचुन बसेल दातखिळी...

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

Chetan Bodke

Anant Ambani: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मोठ्या जल्लोषात त्यांनी एकमेकांना अंगठी घालत एकमेकांचे प्रेम व्यक्त केले. साखरपुडा झाल्यानंतर अनेक गोष्टींची चर्चा झाली. त्यातच आणखी एका गोष्टीची चर्चा झाली ती म्हणजे, अनंत अंबनींनी घातलेले ब्रोच. त्या छोट्या ब्रोचने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले.

मोठ्या थाटामाटात आणि राजेशाही थाटात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींसह काही उद्योजकांनीही हजेरी लावली होती. या सर्वांचे फोटो हजेरी लावताच क्षणार्धातच व्हायरल झाले. तिथे ही सेलिब्रिटींच्या कपड्यांची ही चर्चा झाली.

राधिका मर्चंटने तिच्या साखरपुड्यात लोकप्रिय फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला 'गोल्ड सिल्क टिश्यू घागरा' परिधान केला होता. तर मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीने गडद निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. त्याच्या कुर्त्याच्या कोटवर ‘कार्टियर पँथर ब्रोच’ लावला होता.अनंतच्या कपड्यापेक्षा आणि लुकपेक्षा त्याच्या या ब्रोचची सर्वत्र चर्चा होती.

‘कार्टियर पँथर ब्रोच’ हा प्लॅटिनम आणि सोन्यापासून निर्मित केला आहे. अनंत यांच्या ब्रोचला हिऱ्यांनी मढवलेले आहे. तर या पॅंथरचे चमकणारे डोळे पाचू हिऱ्यांचे असल्याने अधिकच शोभून दिसत आहे. या ब्रोचची किंमत १ कोटी १३ लाख ५१ हजार ०८७ पासून १ कोटी ३२ लाख २६ हजार ०८५ पर्यंत असते. अनंत अंबानी याचा ब्रोचही कस्टमाइझ होता. परंतु अनंतने घातलेल्या ब्रोचची किंमत नक्की किती हे अजून समोर आलेलं नाही. त्याच्या ब्रोच किंमतही १ कोटी १३ लाख ते १ कोटी ३२ लाखांच्या दरम्यान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT