Amruta Khanvilkar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khupte Tithe Gupte: 20 वर्षे झाली पण... 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये अमृता खानविलकरने सांगितले नवऱ्याविषयीचं मोठं गुपित

Amruta Khanvilkar Husband: अमृता खानविलकरने नुकतीच झीमराठीवरील अवधूत गुप्तेचा शो 'खुपते तिथे गुप्ते'ला हजेरी लावली होती.

Pooja Dange

Amruta Khanvilkar Spoke About Her Relationship:

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी सिनेविश्वावतील आघाडीची अभिनेत्री आहे. अमृताने मराठीसह हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक रिअलिटी शो देखील गाजवले आहेत.

अमृता खानविलकर अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना आहे. तिच्या 'वाजले की बारा' या लावणीची क्रेज अजूनही प्रेक्षकांनामध्ये पाहायला मिळते. तिची 'चंद्रा' ही लावणी देखील खूप गाजत आहे.

अमृता खानविलकरने नुकतीच झीमराठीवरील अवधूत गुप्तेचा शो 'खुपते तिथे गुप्ते'ला हजेरी लावली होती. या शोमध्ये अमृताने अनके गोष्टीचा उलघडा आणि खुलासा केला.

कार्यक्रमादरम्यान अमृता खानविलकरला अवधूत गुप्तेने एक फोटो दाखवला. तसेच त्या फोटोतील व्यक्तीविषयी खुपणारी गोष्ट सांगायला सांगितली. तो फोटो अमृताचा नवरा हिमांशूचा होता.

अमृता आणि हिमांशू यांचे २०१५ साली लग्न झाले. हिमांशू हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेता आहे. एका डान्स रिऍलिटी शोमुळे दोघे खूप प्रसिद्ध झाले.

हिमांशूविषयी खुपणारी गोष्ट सांगताना अमृता म्हणाली, 'हिमांशू मल्होत्रा माझे पती आहेत. त्याच्या अनेक गोष्टी मला खुपतात. पण मी त्या सगळ्या सांगू शकत नाहीत. जवळपास २० वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो.'

अमृता खानविलकर पुढे म्हणाली, 'आमचं नातं खूप छान आहे. त्याला मला काही गोष्टी खुपतात. त्यातील एक म्हणजे मी कोणालाच घाबरत नाही. पण तो प्रत्येक गोष्टीला घाबरतो. तो घरात मोठा आहे. त्याचे वडील खूप लवकर गेले. त्यामुळे सगळी जबाबदारी हिमांशूवर आली. ही माझी खुपणारी गोष्ट आहे. तो घाबरट नसता तर आमचं आयुष्य खुप वेगळं असतं.' (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT